एक पडदा चित्रपटगृहांच्या समस्यांवर योग्य तोडगाही काढणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑक्टोबर २०२१ | मुंबई | राज्यातील चित्रपटगृहांनी अग्नी, स्थापत्यविषयक अशा योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करावीत, असे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर सिनेमा ओनर्स एन्ड एक्झिबिटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. आर्थिक कोंडीत सापडलेल्या एक पडदा चित्रपटगृहांना कसा दिलासा देता येईल यासाठी योग्य तो तोडगा वित्त विभागाच्या समन्वयाने काढण्यात येईल असेही ते म्हणाले.  यावेळी खासदार, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलीस महासंचालक संजय पांडे आदींची उपस्थिती होती.

विविध परवान्यांच्या नुतनीकरणासाठी राज्य शासनाने सवलत द्यावी तसेच सिनेमा लायसेन्सचे विनामूल्य नुतनीकरण करून द्यावे, जीएसटी भरल्यानंतर प्रत्येक तिकीटामागे 25 रुपये सर्व्हिस चार्जेस आकारण्यास परवानगी द्यावी, विद्युत वापर नसल्याने देयके मिनिमम वापरावर आधारित असू नये, मिळकत कर आकारू नये, अशा मागण्या करण्यात आल्या.

असोसिएशनच्या वतीने नितीन दातार, निमेश सोमय्या, पूना एक्झिबिटर असोसिएशनचे सदानंद मोहोळ, अशोक मोहोळ, प्रकाश चाफळकर यांनी आपल्या मागण्या सादर केल्या.


Back to top button
Don`t copy text!