दैनिक स्थैर्य । दि. २३ फेब्रुवारी २०२२ । फलटण । राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी यांच्या दि. २२ व २३ फेब्रुवारी होणाऱ्या संपात सहभागी मात्र काळ्या फिती लावून काम करण्याचा एकल प्रा. शिक्षक सेवा मंचचा निर्णय घेण्यात आलेला होता. राज्य सरकारी, निम सरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासनाकडे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दीर्घकाळ प्रलंबीत आहेत, या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून त्याची पूर्तता करुन घेण्यासाठी यापूर्वी शासनाला निवेदन देण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांकडील प्रलंबीत मागण्यांबाबत मध्यवर्ती संघटनेने मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने या संपात सहभागी होण्याचा निर्णय झाल्याचे एकल प्रा. शिक्षक संघटनेने स्पष्ट केले आहे.
विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवुन संपात सहभाग असला तरी काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतला आहे, तथापी प्रलंबीत प्रश्नांवर तोडगा न निघाल्यास भविष्यात संप व आंदोलनाचा निर्णय घेण्याचे सूतोवाच एकल प्रा. शिक्षक सेवा मंचने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.