
दैनिक स्थैर्य । दि. ३० जून २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेल्या एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्त झाले याचा विशेष आनंद आहे. स्व. यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर चौथ्यांदा एकनाथ शिंदे यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. एकनाथ शिंदे व माझे व्यक्ती: स्नेहाचे संबंध राहिले आहेत. सातारा जिल्ह्याच्या समतोल व चौफेर विकासासाठी त्यांनी योगदान द्यावे, आमची त्यांना कायम साथ असेल. सातारा जिल्ह्यातील तमाम जनतेच्या वतीने साताऱ्याच्या भूमिपुत्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन, असे मत विधान परिषदेचे सभापती नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्हाट्सअप स्टेटस द्वारे पोस्ट केलेले आहे.