दैनिक स्थैर्य । दि. ०५ ऑगस्ट २०२२ । फलटण । राजस्थानमधील गंगानागर येथे झालेल्या राष्ट्रीय कुराश (कुस्ती) स्पर्धेत सोमंथळी ता. फलटणची कन्या पै. कु. समता दत्तात्रय गोफणे हीने रौप्यपदक मिळवले.
तिला NIS चे कुस्ती कोच प्रा. अमोल साठे, कुराशचे महासचिव शिवाजी साळुंखे, पै. खाशाबा कर्चे यांनी मार्गदर्शन केले.
तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.