रिलायन्स रिटेलमध्ये 7,500 कोटी रुपये गुंतवणार सिल्व्हर लेक, केकेआरही रांगेत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.१०: जिओ प्लॅटफॉर्ममध्ये सुमारे दीड लाखाच्या गुंतवणुकीचे लक्ष्य गाठल्यानंतर आता उद्योजक मुकेश अंबानी रिटेल आर्म रिलायन्समध्ये विदेशी गुंतवणुकीचे सत्र सुरू करण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकी इक्विटी फर्म सिल्व्हर लेक १.७५ टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठी ७ हजार ५०० कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा रिलायन्स रिटेलने बुधवारी केली.

या करारात रिलायन्स रिटेलचे मूल्य ४.२१ लाख कोटी असण्याची शक्यता आहे, तर केकेआर ही आणखी ही एक अमेरिकी फर्म रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक करू शकते. दोन्ही कंपन्यांमध्ये या कराराबाबत चर्चा सुरू आहे. केकेआरही रिलायन्स रिटेलमध्ये ७ ते ८ हजार कोटींची गुंतवणूक करू शकते. सिल्व्हर लेकसोबतच्या कराराबाबत आनंद व्यक्त करताना रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले, लाखो लहान व्यावसायिकांसोबत करार करण्याच्या परिवर्तनवादी विचारासह सिल्व्हर लेक जोडली गेली आहे. रिलायन्स रिटेल ही देशातील सर्वात मोठी संघटित रिटेल कंपनी आहे. कंपनीचे देशभरात १२ हजारांपेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. याशिवाय कंपनीने जिओमार्ट हे ऑनलाइन ग्रॉसरी स्टोअरही लाँच केले आहे. दरम्यान, गुंतवणुकीच्या वृत्तामुळे बुधवारी रिलायन्स समूहाच्या समभागांमध्ये तेजी दिसली. बीएसईमध्ये कंपनीचे समभाग २.५७ टक्क्यांनी वधारत २१६१.२५ रुपयांवर बंद झाले.

रिटेल व जिओचे बाजारमूल्य ९ लाख कोटींच्या पार

सिल्व्हर लेक जगभरात तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी गुंतवणूकदार कंपनी मानली जाते. सिल्व्हर लेक यापूर्वी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये १०,२०० कोटींपेक्षा जास्तीची गुंतवणूक केली आहे. रिलायन्स रिटेल आणि जिओ प्लॅटफॉर्मस्चे एकूण बाजार मूल्य ९ लाख कोटींच्या पार केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!