दैनिक स्थैर्य । दि.०९ मार्च २०२२ । मुंबई । “वारे मोदी तेरा खेल सस्ती दारु महंगा तेल” असा नारा देण्याची वेळ नागरीकांवर आली आहे. युक्रेन तसेच रशीया मध्ये सुरु असलेल्या युध्दाचा आडोसा घेत भारतातील व्यापा-यांनी सर्वच वस्तुंची भाववाढ करण्याचा सपाटा लावला आहे. दरम्यान या भाववाढीमुळे सर्वसामान्य नागरीक आर्थीक अडचणीत आले असून केन्द्र सरकारने भाव वाढीवर नियंत्रण न आनल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी दिला आहे.
रशिया व युक्रेन युद्धाचा परिणाम खाद्यतेलाच्या दरवाढीवर होणे स्वाभाविक आहे. मात्र पर्याप्त साठा असतांना भारतातील व्यापारी मात्र या युध्दाच्या आड सर्वच वस्तुंची भाववाढ करीत आहे. गेल्या दहा दिवसांत खाद्यतेलाचे भाव प्रतिकिलो 30 ते 40 रुपयांनी वाढले आहेत. तर प्रति 15 किलो तेलाच्या डब्या मागे 400 ते 500 रुपयांची वाढ झाली आहे. युध्दामुळे आयात ठप्प झाल्याने खाद्यतेलाची भाव वाढ झाल्याचे सांगीतले जात आहे. मात्र पर्याप्त साठा असतांना भाव वाढविण्याची घाई का असा प्रश्न सिकंदर शहा यांनी उपस्थित केला आहे. युध्दाच्या पार्श्व भूमिवर आपल्याकडे गहू, सोयाबिन, रासायनिक उर्वरके, धातूंच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. आठ दिवसपुर्वीच यवतमाळात 60 रुपये किलो असलेले लोखंड आता 88 रुपये किलो झाले आहे. यामुळे घर बांधणारे अडचणीत आले आहे. अफगाणीस्तान येथे तालीबानी सरकार सत्तेवर येताच भारतात व्यापा-यांनी 580 रुपये किलोची बदाम 1350 रुपये किलो केली होती. त्यानंतर काही दिवसातच पुर्ववत साडे पाचशे रुपये किलो झाली. आता सुध्दा युध्दाचे नाव समोर करुन सर्वच वस्तुंचे भाव अशाच पध्दतीने वाढविले जात आहे. या भाव वाढीने गृहीणींचे किचन बजेट चांगलेच कोलमडले आहे. विशेष म्हणजे तेल उत्पादक कंपण्यांनी इंधन दरात वाढ करण्याची शिफारस केन्द्र सरकारकडे केली आहे. यामध्ये जवळपास पंधरा ते वीस रुपये दर वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. युध्दामुळे जागतिक बाजारात कच्चे तेल महागले आहे त्यामुळे भारतात पेट्रोल प्रतिलिटर 125 च्या जवळपास होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास इतरही वस्तुंची आनखी भाववाढ होण्याची शक्यता आहे. अशा गंभीर परीस्थितीत केन्द्र सरकारने कठोर पाऊले उचलत भाववाढ नियंत्रित करणे गरजेचे आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष सुध्दा आक्रमकपणा दाखवित नसल्याने सर्वसामान्यांचा कुणीच वाली नसल्याची टिका सिकंदर शहा यांनी केली असून या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा सुध्दा दिला आहे.
शेतक-यांचा वाली कोण
बियाणे, खते तसेच शेती संबंधीत सर्वच वस्तुंचे भाव वाढलेले आहे. दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणेही कठीन झाले आहे. अशा परीस्थितीत युध्दाच्या नावाखाली खते, बियाने तसेच इतर वस्तुंच्या किंमती वाढविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. लवकरच खरीप हंगाम येणार असल्याने सरकारने भाववाढीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. असे न झाल्यास आधीच अडचणीत असलेला शेतकरी आनखी डबघाईस आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे केन्द्र सरकारने याकडे गंभीरतेने बघून भाववाढीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी सिकंदर शहा यांनी केली आहे.