दैनिक स्थैर्य । दि. १२ जुलै २०२२ । मुंबई । आपले अद्वितीय नेटवर्क, डेटाची अविश्वसनीय संपत्ती आणि रोजगार बाजारपेठेबाबत असलेली सखोल माहिती यांचा लाभ घेत शाईन डॉटकॉम (Shine.com) या भारतातील दुस-या सर्वात मोठ्या जॉब सर्च व्यासपीठाने नीवन ‘टॅलेण्ट इनसाइट्स’ अहवाल सादर केला आहे, ज्यामधून झपाट्याने विकसित होत असलेल्या भारतीय बाजारपेठेतील आशावादी, पण महत्त्वपूर्ण ट्रेण्ड्स सांगण्यात आले आहेत. अहवाल निदर्शनास आणतो की, आर्थिक वर्ष २०२१ च्या तुलनेत रोजगार संधी व नवीन रोजगारांनी आर्थिक वर्ष २०२२ मध्ये संधींना लक्षणीय चालना दिली आहे. एप्रिल-मे २०२२ मध्ये रोजगार बाजारपेठेला गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत मोठी उसळी मिळाली आहे.
तसेच अहवालाने निदर्शनास आणले की, ४८ टक्के कंपन्यांनी २०२२-२३ मध्ये कार्यालयातून कामकाज सुरू करण्याचा विचार केला आहे, तर ४० टक्के कंपन्या हायब्रिड मॉडेलला प्राधान्य देतात आणि उर्वरित १२ टक्के कंपन्या वर्क-फ्रॉम-होम दृष्टीकोनाबाबत समाधानी आहेत. तसेच अहवालाने नोकरीच्या ट्रेण्डमध्ये लक्षणीय बदल अधोरेखित केला आहे. ८१ टक्के कंपन्यांनी मान्य केले की नॉन- मेट्रो शहरांमध्ये रोजगार वाढले आहेत. हे प्रामुख्याने दूरून काम करण्याच्या सुविधांमुळे आणि खर्च कमी करण्याच्या संधींसह विस्तार करण्याच्या शक्यतांच्या कारणास्तव कार्यालये नॉन-मेट्रो भागात स्थलांतरित झाल्यामुळे शक्य झाले आहे. हा नियुक्ती करण्याचा ट्रेण्ड आधुनिक काळातील स्टार्ट-अप्समध्ये लक्षणीयरित्या अधिक दिसून येत आहे.
शाईन डॉटकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अखिल गुप्ता म्हणाले, “आम्ही आमच्या एचआर व्यावसायिकांच्या व्यापक नेटवर्कचे आभार मानतो, ज्यांनी त्यांची बहुमूल्य माहिती शेअर केली आहे आणि आम्हाला पहिले मिंट + शाइन टॅलेण्ट इनसाइट्स लॉन्च करण्यामध्ये मदत केली आहे. या अहवालामध्ये भौगोलिक क्षेत्रांमधील व विभागांमधील नियुक्ती ट्रेण्ड्सचा समावेश असण्यासोबत टॅलेण्टमध्ये झालेली कपात व पगारवाढ अशा सौम्य पैलूंचा देखील समावेश आहे. आमची काळासह यामध्ये बदल करण्याची आणि व्यापक एचआर समूह व नोकरी-साधकांना अधिक संबंधित माहिती देण्याची इच्छा आहे.”
वेतनवाढ विभाग हा व्यावसायिक आणि नोकरी शोधणा-यांसाठी अहवालाचा सर्वोत्तम भाग आहे. शाईन डॉटकॉम च्या टॅलेण्ट इनसाइट्स’ अहवालानुसार चारपैकी तीन केसेसमध्ये कर्मचारी या आर्थिक वर्षात दोन अंकी वाढीची अपेक्षा करू शकतात, तर एक तृतीयांश केसेसमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ मिळण्याचा अंदाज आहे.
अहवालात झपाट्याने बदलत असलेल्या क्षेत्र, राज्य, शहर च विभाग-निहाय नियुक्ती ट्रेण्ड आणि समकालीन रोजगाराच्या बाजारपेठेवर वर्चस्व गाजवणारे प्रमुख कौशल्य क्षेत्र व प्रोफाइल यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. याबाबतचे अवलोकन पुढीलप्रमाणे:
आर्थिक वर्ष २०२१ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२२ मध्ये रोजगार संधींप्रती क्षेत्र व राज्याचे योगदान:
शाईन डॉटकॉमच्या अहवालानुसार, गेल्या दोन वर्षांत रोजगाराच्या संधींमध्ये क्षेत्रीय योगदान कमी-अधिक प्रमाणात सारखेच राहिले आहे, तरीही या प्रमाणामध्ये दक्षिण क्षेत्राचा (४१ टक्के) सर्वात लक्षणीय भाग आहे. त्यानंतर उत्तर (२६ टक्के), पश्चिम (१९ टक्के) आणि पूर्व (१३ टक्के) या क्षेत्रांचा क्रमांक आहे.
राज्याच्या योगदानासंदर्भात महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू हे अव्वल तीन दावेदार आहेत, जे या कालावधीत त्यांच्या स्थानावर कायम राहिले आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, एकूण रोजगार संधींपैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त संधी या राज्यांमधून येतात.
त्याचप्रमाणे, मेट्रो (४० टक्के) शहरांनी रोजगार बाजारपेठेतील सिंहाचा वाटा कायम ठेवला आहे. पण, आर्थिक वर्ष २०२२ मध्ये १ लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांचा वाटा देखील वाढला आहे.
आर्थिक वर्ष २०२१ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२२ मध्ये विभाग-निहाय रोजगार संधी:
आयटी क्षेत्राने नोकरीच्या संधींमध्ये अग्रगण्य योगदान देणारे स्थान कायम ठेवले असले तरी गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत त्यात थोडीशी घसरण झाली आहे. पण ११ टक्क्यांची मोठी घसरण झालेल्या उत्पादन क्षेत्रासोबत याची तुलना करता येऊ शकत नाही.
दुसरीकडे, बँकिंग, फायनान्शियल सर्विसेस अॅण्ड इन्सुशरन्स सेक्टर (बीएफएसआय)ने लक्षणीय वाढ केली आहे आणि एकूण रोजगार संधींमध्ये ६ टक्के वाढ नोंदवली आहे. तसेच, एकूणच रोजगाराच्या संधींमध्ये बांधकाम, रिक्रूटमेंट, शिपिंग आणि शिक्षण क्षेत्राचे योगदानही वाढत आहे.
आघाडीच्या रोजगार बाजारपेठा आणि शहरानुसार पसंती:
Shine.com च्या अहवालानुसार निम्मे रिक्रूटर्स बेंगळुरूला भारतातील टॉप-टियर जॉब मार्केट मानतात. पण शहरनिहाय रोजगाराच्या प्राधान्यांबाबत बेंगळुरू, दिल्ली एनसीआर आणि मुंबई या शहरांना जवळपास समान प्राधान्य दिले जात आहे. या तीन उच्चस्तरीय शहरांव्यतिरिक्त चेन्नई आणि जयपूर देखील आधुनिक युगातील नियुक्ती करणा-यांच्या दृष्टीने लोकप्रिय होत आहेत.
मागणीमध्ये असलेली कौशल्ये वि. ट्रेण्डिंग प्रोफाइल्स:
सर्व क्षेत्रे, एमएनसी, कॉर्पोरेट्स, स्टार्ट-अप व इतर क्षेत्रांमध्ये डिजिटल मार्केटिंग (३८ टक्के) हे सर्वाधिक मागणी असलेले कौशल्य आहे. त्यानंतर प्रोग्रामिंग लँग्वेज (आयटी पायथॉन), क्लाउड कम्प्युटिंग आणि डेव्हऑप्स यांचा क्रमांक आहे, तर तिसरे सर्वात लोकप्रिय कौशल्य म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगमधील कौशल्य. दुसरीकडे, सर्वात उल्लेखनीय जॉब प्रोफाइलच्या बाबतीत डेटा सायंटिस्टला (५० टक्के) सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. त्यानंतर क्लाउड आर्किटेक्ट (२० टक्के) आणि ब्लॉकचेन इंजीनिअर (१० टक्के) यांचा क्रमांक आहे.