एंजल वनच्या ग्राहकसंख्येत भरघोस वाढ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ जुलै २०२३ । मुंबई । फिनटेक कंपनी एंजल वन लिमिटेडने उल्लेखनीय वाढीची नोंद केली, जेथे त्यांच्या ग्राहकांची संख्‍या वार्षिक ४४.७ टक्क्यांच्या वाढीसह १५.०६ दशलक्षपर्यंत पोहोचली, ज्यामध्ये जून २०२३ मधील एकूण ग्राहक संपादनामध्ये वार्षिक ४०.० टक्क्यांच्या वाढीसह ०.४८ दशलक्ष ग्राहकांचा समावेश होता.

एंजल वनची ग्राहकांना डिजिटल-केंद्रित आर्थिक सोल्यूशन्स आणि एकसंधी युजर अनुभव देण्याप्रती कटिबद्धता व्यवसाय घटकांमधून दिसून येते. जून २०२३ मध्ये कंपनीने वार्षिक २७.८ टक्क्यांच्या वाढीसह ८९.६९ दशलक्ष ऑर्डर्सची नोंद केली, जी वार्षिक ३३.९ टक्क्यांच्या वाढीसह सरासरी ४२७ दशलक्ष दैनंदिन ऑर्डर्सची समानुपाती आहे. कंपनीचे सरासरी क्लायंट फंडिंग बुक जून २०२३ पर्यंत ११.१७ बिलियन रूपये राहिले.

फिनटेक कंपनीने आपल्या अद्वितीय म्युच्युअल फंड एसआयपींमध्ये लक्षणीय वाढ कायम राखली, जे वार्षिक ९६७.२ टक्क्यांच्या वाढीसह १६०.०८ हजारांपर्यंत पोहोचले. कंपनीचा सरासरी दैनंदिन टर्नओव्हर वार्षिक १४६.३ टक्क्यांच्या वाढीसह २४,०५१ बिलियन रूपयांपर्यंत पोहोचला आणि रिटेल मार्केट शेअर वार्षिक २५.८ टक्क्यांच्या वाढीसह ४५८ बीपीएसपर्यंत पोहोचला.

एंजल वन लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश ठक्कर म्‍हणाले, “आमच्या वाढत्या ग्राहकवर्गामधून आमचे सतत नाविन्यता आणण्याचे प्रयत्न ग्राहकांना समाधान देत असल्याची पुष्टी मिळते. आमच्या ग्राहकांना एकसंधी अनुभव देण्यासह आम्ही आता त्यांना आमच्या सुपर अॅपच्या माध्यमातून वैयक्तिकृत मालमत्ता निर्मितीसह सुसज्ज करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही द्वितीय, तृतीय व त्यापलीकडील श्रेणीच्या शहरांमधील अधिकाधिक गुंतवणूकदारांना ऑनबोर्ड करण्यास, तसेच त्यांना त्यांची आर्थिक ध्येये सुलभपणे संपादित करण्यामध्ये सक्षम करण्यास उत्सुक आहोत.”

एंजल वन लि. चे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री. प्रभाकर तिवारी म्हणाले, “आमच्या ग्राहकांची संख्या १५ दशलक्षपेक्षा अधिक झाली आहे, ज्यामधून तंत्रज्ञानाद्वारे सक्षम ग्राहक-केंद्रित सोल्यूशन्स प्रदान करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. नाविन्यतेवरील आमच्या सातत्यपूर्ण फोकसने न पोहोचलेल्या बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यामध्ये प्रमुख भूमिका बजावली आहे. आम्ही अधिक पुढे जात डेटा व तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा फायदा घेत अब्जो व्यक्तींचे जीवन सक्षम करणारा विश्वसनीय फिनटेक ब्रॅण्ड बनण्याचे आमचे ध्येय संपादित करण्याप्रती कटिबद्ध आहोत.”


Back to top button
Don`t copy text!