फलटण तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांच्या विकासासाठी भरीव निधी : माजी खासदार रणजितसिंह

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून चालना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश


स्थैर्य, फलटण, दि. २८ ऑक्टोबर : राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्या आणि गावांमध्ये मूलभूत सुविधा पुरवून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत फलटण तालुक्यातील १८ गावांमध्ये विविध विकासकामांसाठी भरीव निधी मंजूर झाला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाला असून, यामुळे या वस्त्यांमधील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मोठी मदत होणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना ही राज्यातील नागरी आणि ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत रस्ते सुधारणा, समाज मंदिर बांधकाम, अभ्यासिका, स्मशानभूमी, पूल बांधकाम, शौचालय बांधकाम आणि संविधान भवन यांसारख्या आवश्यक कामांसाठी निधी दिला जातो. फलटण तालुक्याला या योजनेतून मिळालेला निधी हा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ आहे.

मंजूर झालेली प्रमुख कामे आणि निधी खालीलप्रमाणे:

  1. तडवळे (वाघोली): तक्षशिला नगर येथे अभ्यासिका बांधणे – १० लाख रुपये.
  2. पिंपोडे बुद्रुक: बौद्ध विहार संरक्षण भिंत व व्यासपीठ बांधणे – १० लाख रुपये.
  3. निरगुडी: लोंढे वस्ती ओढ्यावरील पूल बांधणे – २० लाख रुपये.
  4. दालवडी: मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ता सुधारणा करणे – १० लाख रुपये.
  5. गुणवरे: दलित वस्तीमधील रस्ता सुधारणा करणे – १० लाख रुपये.
  6. आसू: मागासवर्गीय वस्तीमध्ये समाज मंदिर बांधणे – १० लाख रुपये.
  7. साखरवाडी: दलित वस्ती अंतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसवणे – १० लाख रुपये.
  8. खामगाव: मागासवर्गीय वस्तीत समाज मंदिर बांधणे – १० लाख रुपये.
  9. सांगवी: जगताप वस्तीवरील रस्ता सुधारणा करणे – १० लाख रुपये.
  10. तरडगाव: मागासवर्गीय वस्तीत समाज मंदिर बांधणे – १० लाख रुपये.
  11. गिरवी: मातंग समाजाकरता स्मशानभूमी बांधणे – १० लाख रुपये.
  12. निंभोरे: मागासवर्गीय वस्तीमध्ये संविधान भवन बांधणे – २० लाख रुपये.
  13. सालपे: दलित वस्तीमधील रस्ता सुधारणा करणे – १० लाख रुपये.
  14. आळजापूर: आळजापूर ते मसुगडे वस्ती रस्ता सुधारणा करणे – १० लाख रुपये.
  15. राजाळे: ग्रामपंचायत जागेत सभा मंडप बांधणे – १० लाख रुपये.
  16. निंबळक: मागासवर्गीय वस्तीत रस्ता सुधारणा करणे – १० लाख रुपये.
  17. सुरवडी: मागासवर्गीय वस्तीत रस्ता सुधारणा करणे – १० लाख रुपये.
  18. सस्तेवाडी: मागासवर्गीय वस्तीमधील हनुमान नगर येथे शौचालय बांधणे – १० लाख रुपये.

या निधी मंजुरीबद्दल बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “फलटण तालुक्याचा विकास करण्याचा जो शब्द मी जनतेला दिला आहे, तो पूर्ण करण्याच्या दृष्टीने मी सातत्याने प्रयत्न करत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून मिळालेल्या या निधीमुळे तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये निश्चितपणे सकारात्मक बदल घडतील.”

या कामांमुळे संबंधित गावांमधील नागरिकांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध होणार असून, त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी होण्यास मदत होईल. लवकरच या सर्व कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Back to top button
Don`t copy text!