सिद्धनाथ-जोगेश्वरी विवाह सोहळ्यास आजपासून प्रारंभ


स्थैर्य, सातारा, दि.22 ऑक्टोबर : म्हसवड येथील श्री सिद्धनाथ व देवी जोगेश्वरी देवस्थानचा पारंपरिक शाही विवाह सोहळ्याचा प्रारंभ बुधवारी (ता. 22) दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरात ’श्रीं’ची घट स्थापना करून वधू-वरास हळदी लावण्याच्या कार्यक्रम करण्यात आला अशी माहिती मंदिर ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.

श्रीं’चा शाही विवाह सोहळा कार्तिक प्रतिपदा दीपावली पाडवा ते मार्गशीर्ष प्रतिपदा देव दिवाळी असा एक महिन्याच्या कालावधीचा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो. दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर पहाटे पाच वाजता मंदिराच्या मुख्य गाभार्‍यासमोरील दर्शन मंडपातील श्री म्हातारदेव मूर्तीसमोर मंदिराचे सालकरी यांच्या हस्ते ’श्रीं’ची घटस्थापना करून या शाही विवाह सोहळ्याचा प्रारंभ केला करण्यात आला. घटस्थापना होताच ’श्रीं’च्या नवरात्री उपवास उपक्रमात या मंदिराचे सालकरी, गुरव पुजारी, मानकरीसमवेत भाविक सहभागी होत असतात. विशेषतः मंदिराच्या आवारात रात्रंदिवस उभे राहूनही सलग बारा दिवस उपवास करीत असतात. श्री सिद्धनाथ व वधू देवी जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तीस सकाळी अकरा वाजता हळदी लावण्याचा कार्यक्रम झाला. नवरात्र उपवासकरी सोबतच पुजारी, मानकरी व भाविक यांचा दररोज पहाटे सलग बारा दिवस अनवाणी पायी चालत नगरप्रदक्षिणा घालण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!