‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये सिद्धी धनावडेची निवड


स्थैर्य, सातारा, दि. 12 नोव्हेंबर : जावळी तालुक्यातील सिद्धी धनावडे हिने लोकप्रिय ज्ञानस्पर्धा कौन बनेगा करोडपती’ मध्ये स्थान मिळवत संपूर्ण तालुक्याचा अभिमान उंचावला आहे. तिची हॉट सीटसाठी झालेली निवड ही जावळी तालुक्याच्या दृष्टीने अभिमानास्पद आणि प्रेरणादायी कामगिरी मानली जात आहे.
सिद्धी धनावडेने कठोर परिश्रम, अभ्यासू वृत्ती आणि शांत आत्मविश्वासाच्या जोरावर मोठ्या प्रतिस्पर्ध्यांमधून आपले वेगळेपण दाखवत केबीसीच्या प्रेक्षागृहापर्यंत मजल मारली आहे.
जावळीतील साध्या घरातून आलेली ही मुलगी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवरील या प्रतिष्ठित मंचावर पोहोचली असून तिच्या या यशाने संपूर्ण सातारा जिल्ह्यात आनंद आणि अभिमानाची लहर आहे. गावकर्‍यांसह शिक्षक आणि मित्रपरिवारामध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक पातळीवर अनेकांनी सिद्धीच्या कर्तृत्वाचे कौतुक करत तिच्या पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रामीण भागातून राष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचणार्‍या तरुणांसाठी सिद्धी धनावडेचे हे यश प्रेरणादायी ठरणार आहे.


Back to top button
Don`t copy text!