श्यामसुंदरी क्रिकेट क्लबने 37 धावांनी सामना जिंकला

14 वर्षाखालील वयोगटासाठी क्रिकेट सामन्याचे आयोजन


सातारा – विजेत्या खेळाडू समवेत रमेश शानभाग. त्यावेळी अभिजीत मगर भाग्येश कुलकर्णी, अमित उघडे, संकेत शानभाग व इतर. (छाया – अतुल देशपांडे, सातारा)
स्थैर्य, 6 जानेवारी, सातारा – येथील के.एस.डी. शानभाग विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सातारा येथे शामसुंदरी क्लब तर्फे खेळ व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या सतरा वर्षाखालील वयोगटातील मुलासाठी क्रिकेट सामन्याचे आयोजन संपन्न झाले. या स्पर्धेचे उद्घाटन शामसुंदरी क्लबचे संस्थापक रमेश शानभाग यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धेत एकूण सात संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेच्या अंतिम सामना श्यामसुंदरी क्लब सातारा व प्रोफेशनल अकॅडमी सातारा यांच्यात झाला .यामध्ये श्यामसुंदरी क्लबने हा सामना 37 धावांनी जिंकला स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज व सर्वोत्कृष्ट खेळाडू या सर्व खेळाडूंचा स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे विजेत्या संघाला रोख रक्कम व चषक देण्यात आला. संघातील सर्व खेळाडूंनाही प्रशस्ती पत्राचे वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी शामसुंदरी क्लबचे संस्थापक रमेश शानभाग, सचिव संकेत शानभाग, के. एस. डी. शानभाग महाविद्यालय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य भाग्येश कुलकर्णी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अभिजीत मगर, क्रीडा प्रमुख अमित उगाडे सर, क्रिकेट प्रशिक्षक नमराज बटवाल तसेच स्पर्धेतील सर्व खेळाडू विद्यार्थी व पालक उपस्थित होते .

दि. 4 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान 14 वर्षाखालील मुले या वयोगटासाठी क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे .शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व खेळ संघटनेमार्फत घेण्यात येणार्‍या स्पर्धा संपल्यानंतर खेळाडूंना सराव सामने खेळण्याची संधी मिळत नाही ,श्यामसुंदरी क्लबच्या निमित्ताने खेळाडू क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक स्पर्धेसाठी पुन्हा जोमाने तयारी करतील व ते स्पर्धेच्या प्रवाहात राहतील हाच आमचा या स्पर्धा आयोजित करण्यामागचा उद्देश असल्याचे स्पष्टीकरण या स्पर्धेचे प्रमुख संयोजक व क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग यांनी सांगितले तसेच या सर्व विजेत्याखेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


Back to top button
Don`t copy text!