श्यामसुंदरी क्लबतर्फे सातार्‍यात जलतरण स्पर्धां उत्साहात


सातारा – विजेत्यांना गौरवचिन्ह प्रदान करताना रवी खत्री, शेजारी या स्पर्धेत यशस्वी विजेते स्पर्धक. (छायाचित्र – अतुल देशपांडे)

स्थैर्य, 2 जानेवारी, सातारा : श्यामसुंदरी युवा खेळ व सांस्कृतिक स्पर्धा 2025-2026 अंतर्गत के. एस.डी. शानभाग महाविद्यालय, सातारा येथील श्यामसुंदरी ट्रस्ट स्थापित ’आनंद जलतरण तलाव शेथे जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
जलतरण स्पर्धेचे उद्घाटन श्यामसुंदरी क्लबचे संस्थापक रमेश शानभाग व रवी खत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्यामसुंदरी क्लबचे क्रिडाप्रमुख अमित उगाडे सर, प्रशिक्षक रवी नाटेकर सर व महेश काटे सर व स्पर्धेत सहभागी विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.

या जलतरण स्पर्धेत एकुण 48 प्रकारच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यात इंण्डिव्हिज्युयल मेडले, बेस्टस्ट्रोक, फ्रिस्टाईल, बटरफ्लाय, बॅकस्ट्रोक, 4ु100 मी. फ्रिस्टाईल रिले व मेडले रिले या स्पर्धांचा समावेश होता. सर्व स्पथमिध्ये मिळून 12 वर्षाखालील, 14 वर्षाखालील व 17 वर्षाखालील मुले व मुली याव्च्यातून ’उत्कृष्ट जलतरणपट्र निवडून त्यांना ’विजयचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच इतर विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक, पदक व ’रोख बक्षिसे देखील प्रदान करण्यात आली,श्यामसुंदरी क्लबतर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी अशाप्रकारच्या प्रोत्साहनपर विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात व त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो.


Back to top button
Don`t copy text!