दैनिक स्थैर्य । दि. ०६ सप्टेंबर २०२२ । फलटण । फलटण शहरामध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या नियमांची पायमल्ली करून सुरु असलेली वाईन शॉप्स बंद करावीत, अशी मागणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष पांडुरंग अहिवळे यांनी उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक श्री. वैद्य यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.
सदर निवेदनात फलटण शहरात विविध ठिकाणी उत्पादक शुल्क विभागाची पायमल्ली करून वाईन शॉप राजरोजपणे सुरु आहेत. तरी अशी नियमाच्या बाहेर असणारी वाईन शॉप्स तातडीने बंद करावीत, असे अहिवळे यांनी स्पष्ट केले आहे.
नियमाच्या बाहेर असणारी वाईन शॉप्स जर बंद करण्यात आली नाही तर आगामी काळामध्ये मंत्रालयाच्या समोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा सुद्धा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष पांडुरंग अहिवळे यांनी दिला आहे.