दैनिक स्थैर्य । दि. १४ मे २०२३ । अकोला । सोशल मीडियावरील आक्षेपार्ह संवादामुळे उशिरा रात्री निर्माण झालेल्या तणावाच्या पृष्ठभूमिवर अकोला शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अकोला शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसत असून, बाजारपेठेसह दुकाने, पेट्रोल पंप बंद आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता कायम राखण्याचे आवाहन केले आहे.
जुने शहरातील जय हिंद चौक, हरिहरपेठ, अक्कलकोट भागात १३ मे रोजी रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास दोन गटात दगडफेक व हाणामारीची घटना घडली. दोन्ही बाजुकडील गट एकमेकांवर चालून गेल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली. काही समाजकंटकांनी वाहनांची तोडफोड करून काही घरांना आग लावली. दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत अश्रृधुराच्या कांड्या व हवेत गोळीबार करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा जिल्हाधिकारी नीमा अराेरा यांनी संचारबंदी लागू केल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली.
सोशल मीडियावरील आक्षेपार्ह संवादामुळे उशिरा रात्री निर्माण झालेल्या तणावाच्या पृष्ठभूमिवर अकोला शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अकोला शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसत असून, बाजारपेठेसह दुकाने, पेट्रोल पंप बंद आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता कायम राखण्याचे आवाहन केले आहे.