श्रीराम जवाहरने दि.१ ते १५ एप्रिल अखेरच्या गाळपाचे १९ कोटी ४९ लाख २६ हजार ८६७ रुपये बँकेत केले वर्ग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० एप्रिल २०२२ । फलटण । जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी संचलित श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटणने यावर्षीच्या गळीत हंगामात दि. १ ते १५ एप्रिल अखेर ४१६२५.०८८ मे. टन ऊसाचे गाळप केले असून प्रती टन २७६१ रुपये प्रमाणे १९ कोटी ४९ लाख २६ हजार ८६७ रुपये दि. २८ एप्रिल रोजी बँकेकडे वर्ग करण्यात आले आहेत.

यावर्षीच्या गळीत हंगामात दि. २८ एप्रिल अखेर १६८ दिवसात ५ लाख १ हजार १९२ मे. टन ऊसाचे गाळप करुन ५ लाख ७७ हजार ४५० क्विंटल साखर उत्पादन केले असून सरासरी साखर उतारा ११.५९ टक्के मिळाला आहे. त्यापैकी दि. १५ एप्रिल अखेर एकूण ४ लाख ७३ हजार ६७४ मे. टन ७५० क्विंटल ऊस गाळप झाले असून त्याचे प्रती टन २७६१ रुपये प्रमाणे एकूण १३० कोटी ७८ लाख १५ हजार ९८४ रुपये संबंधीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

दि. १ ते १५ एप्रिल अखेर ऊस तोडणी वाहतूक पेमेंट २ कोटी ६१ लाख ६८ हजार २०० रुपये दि. २८ एप्रिल रोजी बँकेत वर्ग करणेत आले आहे. दि. १५ एप्रिल अखेर एकूण ऊस तोडणी वाहतूक पेमेंट २२ कोटी ७५ लाख १६ हजार ६२० रुपये बँकेत वर्ग करणेत आले आहे.


Back to top button
Don`t copy text!