BIG BREKING : श्रीराम कारखान्याच्या निवडणुकीवर स्थगिती । प्रशासक कामकाज पाहणार, मतदार यादीत अफरातफर

निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांची माहिती; शासनाचा आदेश पारित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 13 मार्च 2025। फलटण । श्रीराम सहकारी साखर करण्याची निवडणूक नियमात राबवण्यासाठी आम्ही सर्व जण प्रयत्नशील आहोत. याबाबत मयत व बोगस सभासद दाखवून कारखान्याची निवडणूक हि एकतर्फी करण्याचा डाव हा सत्ताधाऱ्यांचा होता त्यामध्ये तब्ब्ल अंदाजे ४००० हजार सभासदांचा मतदानाचा हक्क जात होते. यासोबतच फक्त ८० सभासदच मतदानास पात्र होते इतर हजारो सभासद हे मतदानास पात्र नव्हते. मयत सभासदांची वारस नोंद सुद्धा कारखान्याने करून घेतली नव्हती. याबाबत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात आम्ही सर्वांनी शाशन स्तरावर व न्यायालयात दाद मागितली आहे. मतदार यादीमध्ये अफरातफर केली असल्याने निवडणुकीला स्थागिती देऊन प्रशासक नेमण्याचा आदेश निर्गमित झाल्याने आम्हाला यश आले आहे; असे मत याचिकाकर्ते तथा निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी व्यक्त केले आहे.

– असा आहे सहकार विभागाचा आदेश –

श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटण या कारखान्याच्या निवडणूक मतदार याद्या चुकीच्या असल्यामुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी निवडणूकीस स्थगिती देऊन प्रशासक नेमण्याबाबत शासनास प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा अहवाल मागविण्यात आला होता. त्यास अनुसरुन सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी संदर्भ क्र.१ च्या पत्रान्वये शासनास अहवाल सादर केला आहे.

सदर अहवालानुसार विश्वास भोसले यांनी साखर कारखान्याच्या प्रारुप मतदार यादीवर घेतलेल्या आक्षेपाच्या अनुषंगाने जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक, साखर, पुणे यांनी दि. २०/०२/२०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार अंतिम मतदार यादीमधून २१२४ मयत सभासद कमी झाले आहेत. साखर कारखान्याने निवडणुक कार्यक्रम राबविण्यासाठी दि. २५/०२/२०२५ रोजी निवडणूक निधी रक्कम रु. १५.० लाख जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांच्या बँक खात्यात जमा केली असल्यामुळे सहकार कायद्यातील कलम ७७अ (१-ब) मधील तरतूद या कारखान्यास लागू होत नाही असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

विश्वास भोसले यांनी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक, साखर, पुणे यांच्या दि. २०/०२/२०२५ रोजीच्या आदेशाविरुध्द उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका क्र. ९१७७/२०२५ दाखल केली आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांचा दि. २०.०२.२०२५ चा आदेश रद्द करण्याबाबत सदर याचिकेत विनंती करण्यात आली आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी संदर्भ क्र.१ अन्वये शासनास सादर केलेल्या अहवालातील तपशील तसेच उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेमध्ये नमुद हरकतींचे गांभीर्य लक्षात घेता सदर याचिकेसंदर्भात उच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटण या कारखान्याची निवडणूक पुढे ढकलण्यात येत आहे.


Back to top button
Don`t copy text!