
दैनिक स्थैर्य | दि. 27 मार्च 2025 | मुंबई | फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक म्हणून प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांची नियुक्ती झाली होती. या निर्णयामुळे संचालक मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
याबाबतचा निकाल लवकरच प्रसिद्ध होईल, त्याच्या परिणामस्वरूप, मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासक काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून समोर येत आहे, यास अद्याप दुजोरा मिळाला नसला तरी याबाबतचा निकाल लवकरच उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रकाशित होईल, अशी माहिती समोर येत आहे.
प्रशासक नेमण्यामागील प्रक्रिया आणि याचिकेवर घेतलेल्या निर्णयाचा तपशील अद्याप समोर आला नाही.
श्रीराम कारखान्याच्या संचालक मंडळाने प्रशासक नियुक्ती विरोधात केलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर, न्यायालयाच्या निर्णयाला कारणीभूत ठरलेली कारणे सुद्धा जाणून घेणे आवश्यक आहे.
श्रीराम कारखान्याचे संचालक मंडळ आणि शासनामधले संघर्ष हे कारणीभूत ठरले आहेत. साखर कारखान्यांच्या कारभाराच्या प्रश्नावरून कधीकधी राजकीय दबावही दिसून येतो.