
दैनिक स्थैर्य | दि. 08 एप्रिल 2025 | फलटण | येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या मुंबई उच्च न्यायालयात पुढील सुनावणी ही सोमवार, दि. 28 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी दिली.
श्रीराम कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेच्याबाबत दैनिक “स्थैर्य”शी विशेष बातचीत करताना चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे बोलत होते.
यावेळी बोलताना डॉ. शेंडे म्हणाले की, श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जुलै महिन्यातील तारीख दिली होती. परंतु याबाबत पावसाळा व इतर अडचणी असल्याची माहिती आमच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दिल्यानंतर उच्च न्यायालयाने सोमवार, दि. 28 एप्रिल रोजी तातडीची सुनावणीसाठी तारीख दिली आहे.
श्रीराम सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रक्रियेच्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्याबाबत बोलताना चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे बोलत होते.