
स्थैर्य, फलटण : येथील श्रीराम बझारच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांसाठी एकूण १६६८ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
ही योजना दि. २ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर या कालावधीत केलेल्या खरेदीवर लागू राहील. योजनेतील बक्षिसांमध्ये पहिले बक्षीस होंडा शाईन १२५ सीसी मोटारसायकल, दुसरे बक्षीस होंडा ॲक्टिव्हा स्कूटर आणि तिसरे बक्षीस होंडा शाईन १०० सीसी मोटारसायकल यांचा समावेश आहे. यासह सॅमसंग स्मार्ट टीव्ही, व्हर्लपूल फ्रीज, सोन्याची अंगठी, सोनी साऊंड सिस्टीम, पैठणी साडी, प्रेशर कुकर, गालीचा अशी आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त खरेदी कुपन्सच्या स्वरूपात १५०० पेक्षा जास्त बक्षिसेही दिली जाणार आहेत.
योजनेची सोडत बुधवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता श्रीराम बझारच्या मुख्य कार्यालयात काढण्यात येणार आहे.