सोडत काढताना तानाजीराव सस्ते, मुगुटराव कदम, अनंत पाटील वगैरे |
स्थैर्य, कोळकी दि. २४ : श्रीराम शेतकरी कामगार सहकारी ग्राहक संस्था लि., फलटण (श्रीराम बझार) च्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या तांदूळ व गहु महोत्सवाला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली वर्षभराची खरेदी केली. गेल्या सुमारे ३० वर्षापासून मुख्यशाखेसह सर्व ११ शाखांमध्ये प्रतिवर्षी तांदूळ व गहु महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे बझारचे जनरल मॅनेजर जयराम राजमाने यांनी सांगितले.
तांदूळ महोत्सवातील ६६२ कुपन्स मधून सोडतीद्वारे ११ भाग्यवान कुपन्स काढण्यात आली, त्या सर्वांना ११० मि. ली. कॉपर बॉटल बक्षीस म्हणून देण्यात आली. गहु महोत्सवतील ११८६ कुपन्स मधून ११ भाग्यवान कुपन्स सोडतीद्वारे काढण्यात आली. त्यांना ५५० वट ज्योती मिक्सर बक्षीस म्हणून देण्यात आले.
बक्षीस विजेत्या ग्राहकांची यादी श्रीराम बझारच्या सर्व शाखांमध्ये लावण्यात आल्या आहेत, ग्राहकांनी आपली बक्षीसे बझारच्या संबंधीत शाखांमधून घेऊन जावीत असे आवाहन बझारच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रारंभी बझारचे सेल्स मॅनेजर तानाजीराव सस्ते यांनी सर्वांचे स्वागत केल्यानंतर सोडतीद्वारे कुपन्स काढण्यात येणार असल्याचे सांगून त्याची प्रक्रिया उपस्थित ग्राहक, सभासद व मान्यवरांना समजावून दिली. त्यानंतर प्रथम तांदूळ व नंतर गहु महोत्सवाची भाग्यवान कुपन्स काढण्यात आली. भाग्यवान कुपन्स धारकांचे अभिनंदन करण्यात आले.
सोडत काढणे व विजेत्या ग्राहकांची नावे जाहीर करताना बझारचे सेल्स मॅनेजर तानाजी सस्ते, चीफ अकौंटंट अनंत पाटील, दै. ऐक्यचे वार्ताहर मुगुटराव कदम यांच्यासह सभासद, ग्राहक उपस्थित होते.