
दैनिक स्थैर्य । 19 एप्रिल 2025।फलटण। सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या येथील जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षपदी श्रीपाल जैन यांची नुकतीच निवड करण्यात आली.ही निवड 2025- 27 या काळासाठी आहे. जैन सोशल ग्रुप परिवार नुतन कार्यकारिणीचा शपथविधी सोहळा दि. 22 एप्रिल रोजी होणार आहे.
सचिवपदी सौ. नीना कोठारी, खजिनदारपदी राजेश शहा यांची निवड झाली.
तसेच कार्यकारिणीचीही निवड करण्यात आली. जैन सोशल ग्रुप अंतर्गत संगिनी फोरमच्या अध्यक्षपदी सौ. मनीषा व्होरा, सचिवपदी सौ. वृषाली गांधी, खजिनदारपदी सौ. विनयश्री दोशी व कार्यकारिणीची निवड करण्यात आली. जैन सोशल ग्रुप अंतर्गत युवा फोरमच्या अध्यक्षपदी पुनीत दोशी, सचिवपदी सिद्धांत शहा, खजिनदारपदी मिहिर गांधी व कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
जैन सोशल ग्रुप अंतर्गत तिन्ही ग्रुपच्या नूतन कार्यकारणी निवडीबद्दल जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष बिरेनभई शहा, महाराष्ट्र रीजन अध्यक्ष दिलीपभाई मेहता, सचिव सचिनभाई शहा, उपाध्यक्ष सचिन दोशी, फलटण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मंगेशभाई दोशी, जैन सोशल ग्रुपच्या माजी अध्यक्षा सौ. सविता दोशी, राजेंद्र कोठारी, डॉ. सूर्यकांत दोशी, माजी सचिव प्रीतम शहा, संगिनी फोरम संस्थापक अध्यक्षा सौ. स्मिता शहा व सर्व पदाधिकारी संचालक व सदस्यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले.