श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या व कृषी महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी; डॉ. विवेक भोईटे यांची प्रमुख उपस्थिती


फलटण येथील श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार, दि. १२ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विवेक भोईटे तर अध्यक्षस्थानी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहेत.

स्थैर्य, फलटण, दि. 11 मार्च : फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण येथे सन २०२५–२६ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी ‘वार्षिक पारितोषिक वितरण समारंभा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा शानदार समारंभ गुरुवार, दि. १२ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुलातील सांस्कृतिक सभागृह येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथील मृदाशास्त्र व कृषी रसायनशास्त्र विषयाचे विशेषज्ञ डॉ. विवेक भोईटे उपस्थित राहणार आहेत. तर या समारंभाच्या अध्यक्षस्थानी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाविद्यालयीन समितीचे व्हाईस चेअरमन श्री. शरदराव रणवरे, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम आणि फलटण एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या समारंभात दोन्ही महाविद्यालयांतील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांनी वर्षभरात शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक या विविध क्षेत्रांत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या पुढील वाटचालीस प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो.

या विशेष कार्यक्रमास श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांच्यासह दोन्ही महाविद्यालयांतील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी या गुणगौरव समारंभास फलटण शहर व परिसरातील सर्व वार्ताहरांनी (पत्रकारांनी) उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!