श्रीमंत शिवाजीराजे महाविद्यालयाचे उद्यानदूत करणार ललगुणच्या शेतकर्‍यांशी संवाद


स्थैर्य, फलटण , दि. 7 डिसेंबर : येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयातील उद्यानदुत प्रशिक्षणासाठी ललगुण ता. खटाव जि.सातारा येथे दाखल झाले आहेत.

या उद्यानदूतांचे ललगुण ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी स्वागत केले. हे उद्यानदूत ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत सुमारे 20 आठवडे येथे वास्तव्यास राहणार आहेत. या मुक्कामादरम्यान ते शेतकर्‍यांना शेतीविषयक माहिती, नवीन तंत्रज्ञान याबाबत माहिती देणार आहेत. याशिवाय माती परीक्षण, फळबाग लागवड, एकात्मिक कीड रोग, बीज प्रक्रिया, आधुनिक शेती औजारांचे वापर, शेतीचा आर्थिक फायदा, जनावरांचे लसीकरण आदीबाबत शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत.

या प्रशिक्षणासाठी ओमकार जगदाळे, चैतन्य लंगुटे, श्रेयांश जैन, गौरव राऊत, तेजस मदने, प्रतिक डोंबाळे या उद्यानदूताना सहकार्य करण्याचे आश्वासन सरपंच ग्रामपंचायत सदस्य, व सर्व ग्रामस्थ यांनी यावेळी दिले. या कार्यक्रमास श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यु.डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.जे.व्ही. लेंभे व प्रा.ए.डी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.


Back to top button
Don`t copy text!