
दैनिक स्थैर्य | दि. २७ सप्टेंबर २०२३ | फलटण |
‘मेरी माटी-मेरा देश’ हा केवळ एक कार्यक्रम नसून, देशाच्या भवितव्याशी स्वतःला जोडण्याचे माध्यम, तसेच हा कार्यक्रम म्हणजे देशाला महान बनवण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे, असे मत श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर व प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांच्या हस्ते श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या व कृषि महाविद्यालय, फलटण येथे ‘मेरी माटी-मेरा देश’ अंतर्गत अमृत कलश मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. देशभक्तीनं भारावलेल्या व्यक्ती हातात ‘मिट्टी’ घेऊन प्रतिज्ञा करुन ‘संकल्प से सिद्धी’ या प्रवासाची संकल्पना मांडू शकतात. बलिदान देणार्यांप्रति आदरांजली अर्पण करतात, असे मत कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांनी व्यक्त केले.
१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत ‘मेरी माटी-मेरा देश’ मोहीम संपूर्ण भारतात राबविण्यात येणार आहे. सदरील कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत पार पाडण्यात आला. कार्यक्रमासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर तरटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.