दैनिक स्थैर्य | दि. ६ मार्च २०२३ | फलटण |
फलटण तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या तालुकास्तरीय कार्यकारणीच्या निवडीसाठी नुकतेच विशेष अधिवेशन झाले. त्यामध्ये नूतन कार्यकारणी निवडण्यात आली असून यामध्ये फलटण तालुकाध्यक्षपदी श्री. निलेश कर्वे, तालुका सरचिटणीसपदी श्री. संतोष कोळेकर, कार्याध्यक्ष श्री. संजय देशमुख सर, कोषाध्यक्ष श्री. प्रशांत खताळ, उपाध्यक्ष श्री. विक्रम घाडगे, उपाध्यक्ष श्री. दत्ता शिंदे, प्रसिद्धी प्रमुख संदीप भोसले, विभागीय उपाध्यक्ष श्री. किशोर तळेकर, सहसचिव किरण बोबडे, संघटक परमेश्वर कांबळे यांसह शिक्षक नेते संभाजी बिटले, तालुका नेतेपदी श्री. रामचंद्र बागल यांची निवड करण्यात आली आहे.
नवनियुक्त कार्यकारिणीचा व शिक्षक समितीच्या सर्व पदाधिकारी यांचा सत्कार सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी करून त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे व नवीन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या आहेत.
सर्वसामान्य शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी सर्वांनी कार्यरत राहावे, शिक्षक समितीच्या पाठीशी आपण ठामपणे राहू, असे आश्वासन श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी उपस्थितांना दिले.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.