
स्थैर्य, फलटण, दि. १५ ऑगस्ट : श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आज गवळीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात जाऊन प्रभू श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. यावेळी पुजारी मठपती कुटुंबीयांनी त्यांच्यासोबत विशेष पूजा केली.
याप्रसंगी मठपती कुटुंबीयांच्या वतीने संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बाळकृष्ण मठपती, सुरेश मठपती, हिरालाल गवळी, नितीन मठपती, किशोरसिंह नाईक निंबाळकर, सिकंदर डांगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.