श्रीमंत संजीवराजे “पुणे रत्न” पुरस्काराने सन्मानित


दैनिक स्थैर्य । 28 एप्रिल 2025। फलटण । फलटण येथील गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उद्योग क्षेत्रातील असामान्य योगदानाबद्दल प्रतिष्ठित असणारा लोकशाही मराठी पुणे रत्न सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पुणे येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात लोकशाही मराठीच्या वतीने पुणे रत्न सन्मान २०२५ चे वितरण करण्यात आले. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वतीने गोविंद मिल्कचे अकौंट्स & फायनान्स विभागाचे सिनिअर मॅनेजर अमोल चावरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे उद्योग क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. यामध्ये त्यांनी फलटण येथे गोविंद मिल्कची स्थापना ग्रामीण भागातील शेकडो महिला, शेतकरी, युवक यांच्या हाताला काम दिले. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव देण्याचे कामही अखंडपणे चालू आहे.

गोविंद मिल्कच्या वाटचालीत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना श्रीमंत सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, गोविंद मिल्क संचालक, सीईओ श्री.धर्मेंद्र भल्ला यांची व दुधउत्पादक महिला, शेतकरी, गोविंद मिल्क परिवाराची मोलाची साथ मिळत आहे.

सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जेष्ठ माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!