
दैनिक स्थैर्य । दि. 26 मे 2025 । फलटण । गेल्या काही दिवस जो संतंतधार पाउस सुरु होता त्यामुळे फलटण शहरासह तालुक्यातील पुरस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे ऑन फिल्ड जात नागरिकांना धीर देण्याचे काम करत होते.
यावेळी माजी आमदार दिपक चव्हाण, जिल्हास्तरिय दिशा समितीचे सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, श्रीराम कारखान्याचे संचालक महादेव माने, माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, माजी नगरसेविका सौ. प्रगती भाउसो कापसे, युवा उद्योजक अभिजीत (भैय्या) जानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना किशोरसिंह नाईक निंबाळकर व सौ. प्रगती कापसे म्हणाल्या की, विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व माजी आमदार दिपक चव्हाण यांच्या माध्यमातुन शनीनगर येथे बाणगंगा नदीवर जी संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे. त्यामुळे प्राथमिक टप्यावर पुरस्थिती निर्माण झाली तरी सुध्दा नागरीकांना मोठ्या प्रमाणावार दिलासा मिळत आहे.
शनिनगर येथे संरक्षक भिंत उभारल्याबद्दल शनिनगर येथील नागरिकांच्यावतीने आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व माजी आमदार दिपक चव्हाण यांचे विशेष आभार माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व माजी नगरसेविका सौ. प्रगती भाउसो कापसे यांनी मानले.