
दैनिक स्थैर्य । 28 मे 2025। फलटण । फलटण तालुक्याचे नेते व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर व फलटणचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील पुरपरिस्थिती आलेल्या ठिकाणी भेट देत आगामी काळामध्ये मदत उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन सुध्दा त्यांनी दिले आहेत.
फलटण तालुक्यातील आसु गावामध्ये पुरस्थितीनंतर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी मदतीचे आश्वासन दिले.
यावेळी युवराज श्रीमंत अनिकेतराजे यांनी फलटण शहरासह तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरी त्यांना मदत मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत.