दैनिक स्थैर्य | दि. १७ जुलै २०२३ | फलटण |
फलटण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १२ मधील विविध विकासकामांचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
या विकासकामांमुळे प्रभाग क्रमांक १२ मधील महाराजा मंगल कार्यालय परिसरातील रस्त्यांची भुयारी गटार योजनेची जवळपास सर्वच कामे मार्गी लागली आहेत. जे काही उर्वरित विकासकामे आहेत ती सर्व कामे मंजूर होऊन कामाला प्रत्यक्षात सुरूवात देखील झालेली आहे. आज त्यापैकीच या परिसरातील बंदीस्त गटार कामाचा शुभारंभ श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी माजी नगरसेविका सुभद्राराजे नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष श्री. पांडुरंग गुंजवटे, माजी नगरसेवक किशोर नाईक निंबाळकर, रामराजे युवा मंचचे अध्यक्ष राहुल निंबाळकर, श्री. फिरोज बागवान, श्री. डॉ. रसाळ, श्री. अमीर शेख, श्री. शैलेंद्र रसाळ, श्री. सुनिल वेताळ, श्री. अशपाक महात, श्री. डॉ. तावरे, श्री. रमेश शिर्के, श्री. जॉनी इंगवले, श्री. नाळे सर, श्री. पवार साहेब, श्री. शगीरभाई शेख, श्री. दत्तोपंत शिंदे, श्री. रणसिंग सर, श्री. सुहास कदम, श्री. गणेश गोरे, श्री. साळूंखे सर, श्री. विष्णूपंत गायकवाड, श्री. अंकुश कर्णे, श्री. किशोर सस्ते, श्री. सुरेश काकडे, श्री. आदित्य रणवरे, श्री. सत्यजित देसाई, श्री. अभिषेक शिंदे, श्री. शोएब शेख, श्री. नाईम शेख, श्री. गुंडगे आणि परिसरातील युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.