दैनिक स्थैर्य | दि. ५ मे २०२३ | फलटण |
ऐतिहासिक फलटण संस्थानचे अधिपती, महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मंगळवार, दि. ९ मे २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता विधानसभेतील विरोधी पक्षनेते ना. अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम फलटणच्या मुधोजी क्लब मैदानावर संपन्न होणार आहे.
यावेळी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांची विशेष उपस्थिती असणार आहे, तर या सोहळ्याचे अध्यक्षस्थान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील भूषविणार आहेत. तसेच यावेळी खा. श्रीनिवास पाटील, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आ.श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दरम्यान, श्रीमंत रामराजेंच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, ते पुढीलप्रमाणे :
शुक्रवार, ५ मे २०२३ रोजी सकाळी ७.३० ते ९.३० वाजेदरम्यान चित्रकला स्पर्धा मुधोजी हायस्कूल येथे होतील.
शनिवार, ६ मे रोजी सकाळी ९.०० वाजता बैलगाडी शर्यतींचे उद्घाटन जाधववाडी, फलटण येथे होईल. बक्षीस वितरण त्याच दिवशी सायंकाळी ७.०० वाजता होईल.
रविवार, ७ मे रोजी सायकल रॅली सकाळी ६.०० वाजलेपासून मुधोजी क्लब मैदान येथून सुरू होईल.
सोमवार, ८ मे रोजी रक्तदान शिबिर सकाळी ९.०० वाजता विडणी, ता. फलटण येथे होईल. ८ मे रोजीच सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजेदरम्यान सासवड, ता. फलटण येथे गोविंद पैठणी स्पर्धा हा महिलांसाठी कार्यक्रम होईल.
सोमवार, ८ मे रोजीच सायंकाळी ५.३० वाजता महिलांसाठी कार्यक्रम ‘आरजे’ अक्षय प्रस्तुत ‘खेळ रंगला पैठणीचा’ होईल. यावेळी प्रमुख उपस्थिती अभिनेत्री प्रार्थना बेहरे, ईशा केसकर यांची असेल. हा कार्यक्रम मुधोजी क्लब मैदानावर आयोजित केला आहे.
दि. १ मे ते ३० जून २०२३ दरम्यान ऑनलाईन गोविंद कामधेनू उत्कृष्ट संकरीत कालवड निवड स्पर्धा होतील.
मंगळवार, ९ मे रोजी सकाळी ९.०० वाजता फलटण तालुक्यातील प्रमुख ७५ मंदिरांमध्ये कृष्णेच्या पाण्याने जलाभिषेक व पूजा कार्यक्रम होईल.मंगळवार, ९ मे रोजीच दुपारी ४.०० वाजता मुधोजी क्लब मैदानावर ग्रंथतुला व कृष्णेचे पाणी तुला कार्यक्रम संपन्न होईल.
मंगळवार, ९ मे रोजीच सायंकाळी ५.०० वाजता मुधोजी क्लब मैदानावर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीमंत रामराजेंच्या या अभीष्टचिंतन सोहळ्यास जिल्ह्यातील तसेच फलटण तालुक्यातील बहुसंख्य जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अमृत महोत्सव अभीष्टचिंतन सोहळा समितीतर्फे करण्यात आले आहे. या समितीच्या अध्यक्षपदी आ. दीपकराव चव्हाण, कार्याध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष अॅड. रमेशचंद्र भोसले, उपाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, श्रीमंत राजसिंहराजे उर्फ बंटीराजे खर्डेकर, सुभाषराव सूर्यवंशी बेडके, डॉ. विजयराव बोरावके, सचिवपदी ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता, सहसचिवपदी भीमदेव बुरूंगले, खजिनदारपदी सुभाषराव धुमाळ, सदस्यपदी बकाजीराव पाटील, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर उर्फ बाळराजे, महोदव पवारआबा, दिलीपसिंह भोसले, रवींद्र बेडकिहाळ, सह्याद्री चिमणराव कदम, बाळासाहेब सोळस्कर, सुरेशबापू साळुंखे, वसंतकाका गायकवाड, डी.के. पवार, बाळासाहेब मोहोळकर कासार, दत्तोपंत शिंदे, हेमंत रानडे, शिरीषकुमार दोशी, हरिष काकडे, अॅड. नरेंद्र कृष्णचंद्र भोईटे हे आहेत.