
दैनिक स्थैर्य । 28 मार्च 2025। फलटण । विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस हा चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्या रोजी प्रतिवर्षी साजरा होत असतो,
यंदाचा गुढीपाडवा हा रविवार दिनांक 30 मार्च रोजी असल्याने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस हा रविवार दिनांक 30 मार्च रोजी मोठ्या उत्साहामध्ये साजरा होणार आहे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे त्यांच्या फलटण येथील लक्ष्मी विलास पॅलेस या निवासस्थानी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारणार आहेत.