दैनिक स्थैर्य । दि. २६ जुलै २०२२ । फलटण । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला रामराम करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेले काही दिवस फलटण तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू होत्या. सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निवडणूक चिन्ह असलेल्या घड्याळ व त्या सोबत “कळेल ही आशा” असे सूचक विधान व्हाट्सअप स्टेटस दारे केलेले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेले काही दिवस श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा विविध माध्यमातून सुरू होत्या. परंतु या बाबत अधिकृत माहिती कुणाकडूनही देण्यात आली नव्हती. नुकतेच कोरेगाव येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात प्रसंगी आमदार महेश शिंदे यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करणार असल्याचे सूचक विधान केले होते. त्यामुळे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यामध्ये विविध चर्चांना उधाण आले होते. या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निवडणूक चिन्ह असलेले घड्याळ व त्या सोबतच “कळेल ही आशा” अशा असल्याचे व्हाट्सअप स्टेटस शेअर केलेले आहे.
गेले काही दिवस फलटणच्या राजकीय वर्तुळामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह संपूर्ण राजे गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला रामराम ठोकून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु याबाबत राजे गटाच्या माध्यमातून कुणीही अधिकृत काहीही बोललेले नव्हते. या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निवडणूक चिन्ह असलेले घड्याळ व “कळेल ही आशा” असे म्हणत व्हाट्सअप स्टेटस शेअर केलेले आहे. त्यामुळे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाबाबत असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.