तुषार गुंजवटे यांची नायब तहसिदार पदी निवड झाल्याबद्दल श्रीमंत रामराजेंच्या हस्ते सत्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये फलटण तालुक्यातील तुषार लक्ष्मणराव गुंजवटे यांची नायब तहसीलदारपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते गुंजवटे यांचा सत्कार करण्यात आला. गुंजवटे यांच्या पुढील वाटचालीबद्दल श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे व श्रीमंत संजीवराजे यांनी शुभेच्छा दिल्या.

तुषार गुंजवटे यांचे मुळ गाव फलटण तालुक्यातील झिरपवाडी असून त्यांचे प्राथमिक शिक्षण मालोजीराजे प्राथमिक विद्या मंदिर फलटण येथे तर माध्यमिक शिक्षण यशवंतराव चव्हाण पाॅलीटेक्निक हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज फलटण येथे झालेले आहे. त्यानंतर शासकीय इंजिनिअर काॅलेज कराड येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले. सध्या ते पुणे येथे खाजगी कंपनी मध्ये नोकरीस होते. त्यांचे वडील लक्ष्मणराव गुंजवटे हे मिंडवस्ती( साठेफाटा) येथे वरिष्ठ मुख्याध्यापक तर आई सौ. छाया लक्ष्मणराव गुंजवटे या बोरकरवाडी येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!