श्रीमंत रामराजेंनी दिल्या शरद पवारांना शुभेच्छा


दैनिक स्थैर्य | दि. 12 डिसेंबर 2023 | फलटण | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री विद्यमान राज्यसभा खासदार शरदचंद्रजी पवार यांचा आज वाढदिवस राज्यसह देशांमध्ये साजरा होत आहे. विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्हाट्सअप स्टेटस द्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून “साहेब; आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा !; शुभेच्छांचा स्वीकार करा” अशा आशयाचे व्हाट्सअप स्टेटस ठेवले आहे. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सोबत गेले असले तरी त्यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत गेले आहेत; त्यांनी आज जाहीररित्या शुभेच्छा दिल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये विविध चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!