श्रीमंत रामराजे व किशोरराजे निंबाळकर यांची ‘हॉटेल सेलिब्रेशन’ला सदिच्छा भेट

फलटणमधील पहिल्या रूफटॉप रेस्टॉरंटच्या चवीचे आणि वातावरणाचे केले कौतुक


स्थैर्य, फलटण, दि. 18 ऑगस्ट : विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि एमपीएससीचे निवृत्त अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी नुकतीच फलटण येथील प्रसिद्ध ‘हॉटेल सेलिब्रेशन’ला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी हॉटेलमधील पदार्थांच्या चवीचे आणि आकर्षक परिसराचे विशेष कौतुक केले.

फलटणमधील पहिले रूफटॉप प्युअर व्हेज रेस्टॉरंट म्हणून ‘हॉटेल सेलिब्रेशन’ अल्पावधीतच खवय्यांच्या पसंतीस उतरले आहे. रिंगरोडवरील रॉयल क्राऊन बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या या हॉटेलमध्ये अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांपासून ते चायनीज आणि कॉन्टिनेन्टल पदार्थांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. येथील शाही थाळी आणि पुल साईड रेस्टॉरंट हे विशेष आकर्षण ठरले आहे.

या भेटीदरम्यान, श्रीमंत रामराजे आणि किशोरराजे यांनी हॉटेलच्या वातावरणाबद्दल आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त केले. फलटणसारख्या शहरात अशा प्रकारचे दर्जेदार रेस्टॉरंट सुरू झाल्याबद्दल त्यांनी व्यवस्थापनाचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!