श्रीमंत रामराजेंच्या हस्ते रविवारी आसू येथील विविध विकासकामांचे उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ८ ऑगस्ट २०२४ | फलटण |
आसू (ता. फलटण) गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन व विशेष सत्कार समारंभ रविवार, दि. ११ ऑगस्ट २०२४ रोजी सायं. ५.०० वाजता विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदारश्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार दीपक चव्हाण असणार आहेत तर यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमनश्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्या सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. श्री. महादेव पवार, श्री. बाळासाहेब शेंडे, राजनभाऊ फराटे, श्री. धनंजय पवार, श्री. बापूराव गावडे, श्री. दशरथ फुले, श्री. विश्वासदादा गावडे, श्री. विकासकाका वरे, श्री. संतोष खटके, सौ. आशादेवी गावडे, श्री. नितीन शिंदे, श्री. महादेव माने, श्री. चंद्रकांत पवार, श्री. संजय परकाळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

याप्रसंगी कु. वैष्णवी विठ्ठल फाळके (इन्कमटॅक्स अधिकारी), श्री. नंदकुमार झांबरे (डॉ.हॅनिमन जीवन गौरव पुरस्कार, महाराष्ट्र राज्य), श्री. ज्ञानदेव अशोक पवार (एपीआय, गोरेगाव, मुंबई), श्री. डॉ. हरिष नानासो पाटणकर (पंतप्रधान यांच्या हस्ते प्रथम आयुष स्टार्टअप अ‍ॅवॉर्ड विजेते), श्री. शुभम उत्तम पाटणकर (एसपी प्रोडक्शन), कु. समिक्षा संपतराव गाडे (सहाय्यक अभियांत्रिकी अधिकारी, जलसंपदा विभाग), कु. शिवानी दयाराम बोडरे (मुंबई पोलीस), हर्ष विकास साबळे (पश्चिम बंगाल येथे नॅशनल कबड्डी स्पर्धेमध्ये निवड) यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी जाहीर सभेचे आयोजन केले असून सभेनंतर स्नेहभोजनाची व्यवस्था केल्याची माहिती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर राजे गट, पूर्व भाग व ग्रामस्थ आसू यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!