स्थैर्य, फलटण, दि. १४ : महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या दिशादर्शक दूरदृष्टीच्या नेतृत्त्वाखाली गेल्या 10 वर्षापासून फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शेतकर्यांच्या हितासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांची प्रसिद्धी राज्यात सर्वदूर पसरली असून शेतकरी हिताचा हा ‘फलटण पॅटर्न’ संपूर्ण राज्यभरात ‘रोल मॉडेल’ म्हणून प्रसिद्ध होत असून आपल्या कल्पक नेतृत्त्वाच्या माध्यमातून शेतकर्यांसाठी विविध योजना राबवणारे, संकट काळात शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहणारे, इतर उद्योग व्यवसायाप्रमाणे बळीराजालाही सर्वतोपरी सोयी – सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सातत्याने धडपडणारे या बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर असंख्य शेतकर्यांचे आशास्थान बनले आहेत. अशा या कर्तृत्तव्वान नेत्याचा आज 14 जून वाढदिवस. त्यानिमित्ताने श्रीमंत रघुनाथराजे यांच्या प्रमुख नेतृत्त्वाखाली फलटण बाजार समितीमार्फत सुरु असलेल्या शेतकरी हिताय योजनांचा हा थोडक्यात आढावा….
बाजार समितीमध्ये आवक आणणार्या शेतकर्यांना अल्प दरात जेवण
फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीने बाजार समितीत आवक आणणार्या शेतकर्यांना अल्प दरात रक्कम रु. 12 / – मध्ये जेवणाची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. शासनाच्या शिवभोजन थाळी योजनेतून दैनंदिन सरासरी 150 थाळी व बाजार समितीच्या मालोजी शिदोरी योजनेतून 50 ते 100 असे एकूण रोज 200 ते 250 थाळी विनामूल्य दिली जात आहे.
जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरळीत ठेवण्यात बाजार समितीस यश
लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस अनेक ठिकाणी अडथळे आल्याचे निदर्शनास आल्याने पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून मार्केट यार्ड, फलटण येथून विविध ठिकाणी शेतमाल घेऊन जाणशरे व्यापारी यांना जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकीची प्रमाणपत्रे वेळीच उपलब्ध करुन दिलने जीवनावश्यक वस्तूंची वाहतुक आणि पुरवठा साखळी सुरु ठेवण्यात आली.
फार्मर्स हेल्पलाईन
कोरोना विषाणू संसर्गाचे पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात शेतकर्यांना दैनंदिन शेतमाल खरेदी – विक्रीच्या बाबतीत तसेच आरोग्यविषयक येत असलेल्या अडचणींची सोडवणूक करणेसाठी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची हेल्पलाईन सुरु करण्यात आली.
मोफत फिरता दवाखाना
बाजार समितीच्या मार्फत मोफत फिरता दवाखाना सुरु करुन तालुक्यात सर्व 135 गावे व फलटण शहरातील नागरिकांची या दवाखान्यामार्फत मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बाजार समितीने शेतकरी हितास्तव कार्डियाक अॅम्ब्युलन्स सुरु केली आहे. लॉकडाऊनच्या काळात सदर कार्डियाक अॅम्ब्युलन्स बाजार समितीने फिरत्या दवाखान्यात रुपांतरीत केली होती. या उपक्रमाचा तालुक्यातील हजारो नागरिकांनी लाभ घेतला. सदर उपक्रमास फलटण तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, फलटण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विक्रांत पोटे व त्यांचे अधिनस्त प्राथमिक आरोग्य केंद्रे यांचे सहकार्य लाभले.
मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप
कोरोना प्रसार नियंत्रणासाठी बाजार समितीने बाजार घटकांना मास्क व सॅनिटायझरचे विनामूल्य वाटप केले. बाजार आवारात प्रवेश करताना प्रवेशद्वाराजवळ सिक्युरिटी केबीन येथे आणि प्रत्ये कअडतीवर सॅनिटायझर व्यवस्था करण्यात आली असून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक केलेला आहे.
स्वच्छता व निर्जंतुकीकरणाला प्राधान्य
रोजच्या रोज मार्केट झाल्यानंतर मार्केट यार्ड परिसराची स्वच्छता करण्यात येते. आठवण्यातून किमान दोन वेळा फलटण नगर परिेदेच्या सहकार्याने परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येते.
संगणकीकृत लिलाव पद्धत
बाजार आवारात गर्दी होणार नाही या दृष्टीने शेतकरी, आडते, खरेदीदार व वाहतूकदार या सर्व घटकांशी योग्य तो समन्वय ठेवून शेतमाल विक्रीस आणण्याबाबत संबंधितांना बाजार समिती स्तरावरुन सूचना केल्या जातात. संगणकीकृत लिलाव पद्धतीचा वापर करण्यावर भर दिला जातो.
गरीबांना मदत
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर मोलमजुरी करणार्या, गरीब, गरजू कुटूंबांवर उपासमारीची वेळ आली असलेने बाजार समितीने हजारो कुटूंबांना कोरडा शिधा, भाजीपाला कीटचे वितरण केले आहे.
असंघटीत कामगारांना मदत
गतवर्षी लॉकडाऊन जारी झाल्यानंतर पाचपांडव आश्रमशाळा, अलगुडेवाडी, ता.फलटण येथील शेल्टर कॅम्पमधील तामिळनाडू व पश्चिम बंगाल येथील 59 कामगारांना रोजच्या रोज मोफत दोन वेळेचा चहा, जेवण, सकाळी नाष्टा, फळे आदींची एकूण 55 दिवस सोय करण्यात आली होती. शिवाय यानंतर या परप्रांतीयांना आपापल्या राज्यात सोडण्यासाठी वाहतूकीची व्यवस्थाही करुन देण्यात आली होती.
कोरोना केअर सेंटरची उभारणी
कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणच्या माध्यमातून ढवळपाटी, वाखरी ता. फलटण (जलनायक श्रीमंत रामराजे नगर) येथील उप बाजार आवारातील कृषी लक्ष्मी मंगल कार्यालयात कोरोना विलगीकरण कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. या कोरोना केअर सेंटरमुळे ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग परिस्थिती आटोक्यात आणण्यात निश्चितच फायदा होणार आहे.
एकूणच फलटण येथे शेतकरी केंद्रबिंदू मानून कार्य करीत असताना शेतकर्यांच्या विविध शेतीविषयक समस्यांची सोडवणूक करुन, शेतमालाला जास्तीत जास्त दर आणि आवक आणणार्या शेतकर्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत फलटण तालुक्यात अलिकडच्या काळात अवतरलेल्या दुसर्या हरितक्रांतीमुळे उत्पादित होत असलेल्या शेतीमालासाठी सक्षम अशी पणन व्यवस्थादेऊन फलटण कृषि उत्पन्न बाजार समिती अधिक लोकाभिमुख व स्पर्धाक्षम करण्यासाठी श्रीमंत रघुनाथराजे सातत्याने धोरणात्मक निर्णय घेत आहेत. विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करणेकरिताही ते कायम तत्पर राहिलेले आहेत.
अशा या लोककल्याणकारी नेतृत्त्वाला वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा !
– प्रसन्न दिलीप रुद्रभटे,
संपादक, दैनिक स्थैर्य.