श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर फलटण प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश


दैनिक स्थैर्य | दि. २६ जुलै २०२३ | सातारा |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर फलटण या शाळेतील कु. ज्ञानदा संजय बोराटे हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणार्‍या इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा (२०२२-२३) मध्ये ३०० पैकी २४२ गुण मिळवून गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले.

या यशाबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे सेक्रेटरी व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, शाळेच्या चेअरमन श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, व्हा. चेअरमन सौ. वसुंधरा नाईक निंबाळकर, शाळा समितीचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. लोंढे, संस्थेचे प्रशासन अधिकारी श्री. निकम सर, अधीक्षक श्री. फडतरे सर, तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली जाधव, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही तिचे अभिनंदन केले.

ज्ञानदाला मार्गदर्शन करणारे श्री. नाळे सर व निंबाळकर सर तसेच सर्व शिक्षक, पालक यांचे अभिनंदन करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!