दैनिक स्थैर्य | दि. ६ मार्च २०२३ | फलटण |
फलटण येथील श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर विद्यानगर, फलटणचा विद्यार्थी कु. राजवीर धीरज कचरे याने कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स राज्यस्तरीय स्पर्धेत ८० मीटर धावणे या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल व ५० मीटर धावणे द्वितीय क्रमांक सिल्वर मेडल तसेच ४ बाय ५० रिले प्रथम क्रमांक (गोल्ड मेडल) मिळवून फलटणचे नाव उंचावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
कु. राजवीरच्या या यशाबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी तथा महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, स्कूल कमिटीच्या चेअरमन श्रीमंत सौ. शिवांजलीराजे संजीवराजे नाईक निंबाळकर, तसेच स्कूल कमिटीच्या व्हा.चेअरमन सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर आणि सर्व स्कूल कमिटी सदस्य, संस्थेचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम सर, अधीक्षक श्री. फडतरे सर व प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली जाधव मॅडम व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांनी त्याचे अभिनंदन केले.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
कु. राजवीरला पालक व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले आहे.