श्रीमंत मालोजीराजे रौप्यमहोत्सव रुग्णालय ठरतेय फलटणकरांसाठी खरीखुरी लाईफ लाईन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि. 22 : कोरोनाच्या दुसर्या लाटेने गतवर्षीपेक्षा परिस्थिती बिकट बनली आहे. फलटण तालुक्यातही कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर संक्रमण झाले असून दररोज 300 ते 400 जण बाधित होत आहेत. अशा कठीण परिस्थितीत रुग्णांसाठी येथील फलटण आरोग्य मंडळ संचलित श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब रौप्यमहोत्सव रुग्णालयाचे लाईफ लाईनफ हॉस्पिटल सेवा देत असून नाईक निंबाळकर राजघराणे व या ठिकाणी कार्यरत असलेले तज्ज्ञ डॉक्टर यांच्यामुळे हे हॉस्पिटल फलटणसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी खरीखुरी लाईफ लाईनच ठरत आहे.

फलटण लाईफ लाईन हॉस्पीटलच्या माध्यमातून तालुक्यातील आरोग्य सेवा विस्तारीत झाल्या. फलटण परिसरातील सर्व स्तरातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा व तज्ञ डॉक्टरांची सेवा पुरविण्याच्या हेतून विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, युवा नेते श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर व फलटण आरोग्य मंडळाचे विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली हे हॉस्पीटल फलटण येथील नामवंत व तज्ञ डॉक्टर आज यशस्वीरित्या चालवत आहेत. विशेष म्हणजे गतवर्षीपासून कोरोना संक्रमणामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आलेला आहे. मात्र लाईफ लाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना उत्तमोत्तम सुविधा पुरवून कोरोनावर मात करण्यासाठी हॉस्पिटलशी निगडीत सर्वच जण रात्रं दिवस कष्ट घेत आहेत. डॉ.सागर गांधी, डॉ.संजय राऊत, डॉ.मेघना बर्वे व डॉ.पार्श्वनाथ राजवैद्य यांचा यामध्ये मोलाचा वाटा आहे. आज फलटण तालुक्यातील अनेक कुटूंबे एकाच वेळी कोरोनाबाधीत होत आहेत. मात्र; या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार घेवून अनेकजण कोरोनामुक्त झालेले आहेत. याबद्दल नाईक निंबाळकर राजघराणे व लाईफ लाईन हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे समाजमाध्यमांद्वारे जाहीररित्या आभारही मानले जात आहेत.

याबद्दल अनेकांनी थक्क करणारे अनुभव व्यक्त केले आहेत. फलटणमधील फळे व भाजीपाला अडत व्यापारी बाळासाहेब ननावरे सांगतात, माझी आई, पत्नी, 71 वर्षाचे वयोवृद्ध वडील, धाकटे बंधू सुभाष, त्यांच्या पत्नी व दोन मुले, माझी आत्या, त्यांचा मुलगा रामदास दंडिले या माझ्या कुटूंबातील कोरोना बाधितांवर लाईफ लाईन हॉस्पिटलचे डॉ. सागर गांधी, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य यांनी उत्तम उपचार केले. आवश्यकतेनुसार बेड, ऑक्सीजन सुविधा, औषधोपचार या ठिकाणी पुरवण्यात आल्या. माझ्या संपर्कातील इतर अनेक जणांनाही या ठिकाणी उत्तम उपचार करण्यात आले आहेत. राजकारणापलिकडेसुद्धा मित्रपरिवार असतो तो वेळोवेळी कसा उपयोगी येतो याचा मला अतिशय चांगला अनुभव या निमित्ताने आला आहे.

लाईफ लाईन हॉस्पिटलमधील सुविधा, तेथील डॉक्टरांकडून मिळणारे उपचार व राजघराण्यातील नेते मंडळींचे सहकार्य याबाबत एक ना अनेक अनुभव सांगण्यात येत आहेत. राजे गटाचे अनेक कार्यकर्ते ना. श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे यांच्या माध्यमातून अनेकांना तात्काळ गरजेनुसार लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये अथवा हॉस्पिटलमार्फत चालवण्यात येत असलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये बेड मिळवून देत आहेत. लाईफ लाईन हॉस्पिटलमुळे या कोरोनाच्या महाभयंकर महामहारीत फलटण व परिसरातील जनतेची कमी पैशात अथवा एखाद्याकडे पैसे नसले तरी राजघराण्यातील सर्वांच्यामुळे उत्तम सोय होत आहे, अशा आशयाचे अनेक ऋणनिर्देशपर भावनिक संदेश समाजमाध्यमांमध्ये आज प्रसारित होत आहेत.


Back to top button
Don`t copy text!