फलटणमध्ये श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 : शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा आढावा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०४ जानेवारी २०२५ | फलटण | फलटण येथे 2 जानेवारी ते 6 जानेवारी या कालावधीत आयोजित केलेल्या श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 चे उदघाटन समारंभ महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या समारंभाचे अध्यक्षस्थान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भूषवले.

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)

समारंभाची सुरुवात दीप प्रज्वलन व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी शेती शाळेची स्थापना व पार्श्वभूमी तसेच दोन्ही महाविद्यालयाची स्थापना हे श्रीमंत शिवाजीराजांचे स्वप्न व महाविद्यालयाचे शेतकऱ्यांसाठी महत्व याविषयी माहिती दिली. कृषी प्रदर्शनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व कृषी, कमीत कमी खर्चातून अधिकतम उत्पादन अशा विविध विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले.

कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी.चव्हाण यांनी प्रमुख पाहुण्याची ओळख करून देताना त्यांच्या कामकाजचा आढावा सविस्तर विषद केला. श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा अल्प परिचय व सामाजिक राजकीय कामकाजाचा आढावा सविस्तर विषद केला.

प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाल, सन्मानचिन्ह व मानाची चांदीची तलवार देऊन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला, ज्यामध्ये ऊस उत्पादक चंद्रकांत बेलदार, द्राक्ष उत्पादक हिंदुराव सूळ, भाजीपाला उत्पादक बाबुराव गायकवाड, दूध उत्पादक सौ. स्वाती पवार, डाळिंब उत्पादक चंद्रकांत आहिरेकर यांचा विशेष सन्मान केला गेला.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जन्मदिनाचे अभिवादन केले व महाविद्यालयाचे फलटण व पंचक्रोशीतील शेतकरीभिमुख कर्तव्य, कृषि प्रदर्शनामध्ये शेतीसाठी लागणाऱ्या कृषी निविष्ठा, शेतीचे यांत्रिकीकरण व आधुनिकीकरण तसेच प्रिसिजन एग्रीकल्चर याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी डिजिटल एग्रीकल्चर, गट शेती आधारित उपक्रम, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती तंत्रज्ञान या विषयावर उपस्थित शेतकरी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी अध्यक्षीय भाषण करताना महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे लाभलेले कुलगुरूंची कारकिर्द, कृषी विद्यापीठातील अडचणी, हवामान आधारित शेती साठी बदललेले ऋतुचक्र, तापमान वाढीचे बदल व शेतीवर होणारे परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी जागतिक तापमान वाढीचे परिणाम आधारित अभ्यास केंद्र स्थापन करण्यात यावे व आधुनिक शेती तंत्रज्ञान आधारित शेतीकडे लक्ष द्यावे असे उपस्थितांना सांगितले.

समारंभासाठी इंटरनॅशल लायन्स क्लबचे चेअरमन भोजराज नाईक निंबाळकर, महाविद्यालय समितीचे व्हाईस चेअरमन शरदराव रणवरे, फलटण सहकारी दूध संघाचे अध्यक्ष, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे, गर्व्हनिंग कॉऊन्सिलचे सदस्य रणजीत निंबाळकर, रमनशेठ दोशी, आर. एच. पवार, शिरीष दोशी, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, सदस्य, शिरीष भोसले, सी. डी. पाटील, अरविंद निकम, दत्तात्रेय अनपट, मोमीन खलील, आर. एस. जाधव, सतीश निंबाळकर, एम. एस. ननावरे तसेच फलटण तालुक्यातील शेतकरी, दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. आर. ससाने, श्रेया गायकवाड, तनिष्का दौंडकर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. ए. पी. रणवरे यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!