श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार कलाप्पाआण्णा आवाडे व जगन्नाथ शिंदे यांना जाहीर; विविध कार्यक्रमांचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०३ मे २०२२ । फलटण । येथील मानाचा असलेला श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार कल्लाप्पाण्णा आवाडे व जगन्नाथ शिंदे यांना श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे. दि. १४ मे रोजी विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते मुधोजी हायस्कूल रंगमंच येथे सांय. ६ वाजता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

दि. १५ मे रोजी श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांचा तेजस्वी इतिहास व आजची परिस्थिती यावर विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे अध्यक्ष स्थानी असणार आहेत. तर सदरील कार्यक्रम मुधोजी हायस्कूल रंगमंच येथे सांय. ६ वाजता आयोजित करण्यात येणार आहे.

दि. १६ मे रोजी जुनी नवी चित्रपट गीते, सुगम अभंग, भावगीत, गझल व लावणी यांचा सहभाग असलेला सुवर्ण संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. तर सदरील कार्यक्रम मुधोजी हायस्कूल रंगमंच येथे सांय. ६ वाजता आयोजित करण्यात येणार आहे.

दि. १७ मे रोजी सुंदर मी होणार या विषयावर मुंबई येथील सौंदर्य तज्ञ डॉ. गौरी चव्हाण यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फलटण येथील भुलतज्ञ डॉ. सुनीता निंबाळकर या असणार आहे. तर सदरील कार्यक्रम मुधोजी हायस्कूल रंगमंच येथे सांय. ६ वाजता आयोजित करण्यात येणार आहे.

दि. १८ मे रोजी जेष्ठ साहित्यिक आप्पासाहेब खोत यांचे व्यथा माणसांच्या कथा कथनाच्या या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तर सदरील कार्यक्रम मुधोजी हायस्कूल रंगमंच येथे सांय. ६ वाजता आयोजित करण्यात येणार आहे.

दि. १९ मे रोजी पुणे येथील मारुती करंडे यांचे धमाल एका लग्नाची या विषयावर एकपात्री नाटक प्रयोग आयोजित करण्यात आले आहे. तर सदरील कार्यक्रम मुधोजी हायस्कूल रंगमंच येथे सांय. ६ वाजता आयोजित करण्यात येणार आहे.

दि. २० मे रोजी पुणे येथील डॉ. स्वाती दैठणकर व सहकलाकारांचे विविध संतरचनांवर आधारित अभिनव नृत्याविष्कार यांची नृत्य आराधना सादर करण्यात येणार आहे. तर सदरील कार्यक्रम मुधोजी हायस्कूल रंगमंच येथे सांय. ६ वाजता आयोजित करण्यात येणार आहे.

दि. २४ मे रोजी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखेतील कलाकारांचे कलाविष्कार आयोजित करण्यात आले आहे. तर सदरील कार्यक्रम मुधोजी हायस्कूल रंगमंच येथे सांय. ६ वाजता आयोजित करण्यात येणार आहे.

दि. २५ मे रोजी स्मृति महोत्सव समारोप समारंभ, कलाविष्कार व बक्षीस वितरण समारंभ हा विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण व फलटण नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. निता मिलिंद नेवसे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम मुधोजी हायस्कूल रंगमंच येथे सांय. ६ वाजता आयोजित करण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!