श्रीकृष्ण एकनाथ आगटे यांचे निधन


स्थैर्य, 19 फेब्रुवारी, सातारा : येथील श्रीरामकृष्ण सेवा मंडळाचे माजी खजिनदार,अनंत इंग्लिश स्कूलचे माजी उपमुख्याध्यापक श्रीकृष्ण एकनाथ आगटे यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी सकाळी पावणेअकरा वाजता निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 86 होते. त्यांचे पश्चात पत्नी ,मुलगा, सून ,नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे .

श्रीकृष्ण आगटे सरांनी श्रीरामकृष्ण सेवा मंडळ तसेच रामकृष्ण भाव धारेमध्ये विशेष योगदान दिले .स्वामी विवेकानंदांवरील शेकडो व्याख्यानांमधून त्यांनी नव्या पिढीसाठी मोठे मार्गदर्शन केले. एक निरलस, निरपेक्ष आणि आदर्श असे व्यक्तिमत्त्व असणाऱ्या श्रीकृष्ण आगटे सरांनी श्रीरामकृष्ण मठ आणि श्रीरामकृष्ण मिशन च्या कार्यातही विशेष योगदान दिले. अनेक लेख ,कथा यावर त्यांनी लेखन केले होते . अतिशय शिस्तप्रिय, वक्तशीर आणि विद्यार्थ्यांचे लाडके असे व्यक्तिमत्व म्हणून ते प्रचलित होते. अनंत इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी अनेक वर्षे आर्मीच्या करिता मार्गदर्शक म्हणून काम केले .

श्रीकृष्ण आगटे यांच्या पार्थिवावर सायंकाळी कैलास स्मशानभूमीत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले .


Back to top button
Don`t copy text!