
दैनिक स्थैर्य । 11 एप्रिल 2025 । फलटण । श्रीकांत बापू सुळ यांची वडजल ता.फलटण ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी चव्हाण, तलाठी मोरे, वडजलचे ग्रामसेवक हिम्मतराव गायकवाड त्याचबरोबर सरपंच सौ.स्वाती अमोल पिसाळ, मा.सरपंच सौ.रेश्मा दत्तात्रय ढेंबरे, माजी सरपंच सौ. संगीता वामन ढेंबरे, माजी उपसरपंच योगेश तानाजी ढेंबरे, विकास हनुमंत पिसाळ, सौ.छाया दादा पिसाळ, ग्रामपंचायत सदस्य व वडजल ग्रामस्थ उपस्थित होते.
नवनिर्वाचित उपसरपंच श्रीकांत सुळ यांचे व ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, मा.आमदार श्री.दिपकराव चव्हाण साहेब, जिल्हा परिषद मा.सदस्य श्री.धैर्यशील उर्फ दत्ताबापू अनपट इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन केले.