दैनिक स्थैर्य । दि. १७ डिसेंबर २०२१ । फलटण । श्रीदत मंदिर संस्थान, मोर्वे, ता. खंडाळा येथे दत्त जयंती निमिताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविक भक्तांनी सहभागी होवून लाभ घ्यावा आडे आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.
मोर्वे ता. खंडाळा येथे दत्तजयंती निमिताने दि. १६ ते १८ मार्च अखेर विविध धार्मिक कार्यकम आयोजीत करण्यात आले असून गुरुवार दि.१६ रोजी सकाळी ६ वाजता महाअभिषेक व आरती, ९.३० वाजता गणेशपूजन, वीणापूजन व नंतर सामुदाईक गुरुचरित्र पारायण सोहळा आरंभ व वीणावादन, दुपारी १२ वाजता व सायंकाळी ६.३० वाजता आरती कार्यकम संपन्न झाला.
शुकवार दि. १७ रोजी सकाळी ६ वाजता श्री दत्त प्रभूंना महाअभिषेक व आरती, त्यानंतर श्री गुरुचरित्र पारायण सोहळा पुढे सुरु दुपारी १२ वाजता व सायंकाळी ६.३० वाजता श्रींची आरती रात्री ८ वाजता ओमदत चिले ओम भजनी मंडळ मोर्वे यांचे भजन होणार आहे.
शनिवार दि. १८ रोजी श्रीदत जयंतीनिमित्त पहाटे ५.३० ते ९.३० पर्यंत श्रींना महारुद्राअभिषेक सकाळी १० वाजता श्री गुरुचरित्र श्री चिले महात्म, शिवलीला मृत पारायण सांगता सकाळी ११ वाजता श्रीदत्त प्रभू यांची आकर्षक फुलांनी सजावट केलेल्या रथातून गावातून प्रदाक्षिणा कोरोनाचे नियम पाळून सायंकाळी ६ वाजता दतजन्म सोहळा व पाळणा नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.