श्री सिद्धिविनायक सहकारी रुग्णालय, ग्रामीण भागातील गरीब व गरजू कुटुंबाचा आधार ठरेल : अरविंद मेहता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०३ जानेवारी २०२२ । गोखळी । महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने त्या भागाच्या सर्वांगीण विकासाची प्रामुख्याने शैक्षणिक विकासाची केंद्रे ठरली असताना श्री सिद्धिविनायक सहकारी रुग्णालय ग्रामीण भागातील गरीब व गरजू कुटुंबाचा वैद्यकीय दृष्टया आधार ठरेल त्यातून राज्यभर सहकारी रुग्णालये उभारण्याची प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी व्यक्त केली आहे.

श्री सिद्धिविनायक सहकारी रुग्णालय लि., गोखळी या नावाने राज्यात ग्रामीण भागातील पहिले सहकारी रुग्णालय उभारण्यात येत असून सदर नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून गोखळी येथे आयोजित सर्व रोग निदान व उपचार शिबीराचे उदघाटन अरविंद मेहता यांचे हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून समारंभपूर्वक करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रेमेंद्र देवकाते, बारामती हे होते. यावेळी बरड प्रा. आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रांजली शेळके, डॉ. गीतांजली साळुंखे, गोखळी प्रा. आरोग्य उप केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सानिया शेख विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या, तर दै. नवराष्ट्रचे तालुका प्रतिनिधी सुभाष भांबुरे, डॉ. राजेश कोकरे, डॉ. पांडुरंग गावडे, डॉ. गोकुळ शिंदे, डॉ. सुरज धुरगडे, डॉ. सचिन कोकणे, डॉ. कल्याण नाळे, डॉ. स्वप्निल खोमणे, डॉ. निखिल गावडे, डॉ. प्रशांत मिड, डॉ. ईशांत शिंदे, डॉ. अभिजीत शिंगाडे, डॉ. दिपिका कोकणे, डॉ. प्रशांत गावडे, डॉ. प्रितम गावडे आदी विविध विषयातील बारामती येथील तज्ञ डॉक्टर्स उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते स्व. प्रल्हाद भाऊ खटके यांच्या प्रथम स्मृति दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व रोग निदान व उपचार शिबीराच्या माध्यमातून स्व. भाऊंच्या आठवणी आणि सामाजिक कार्याला उजाळा मिळेल असे सांगताना ग्रामीण भागात निर्माण होणारे कौटुंबिक वाद, बांधाची भांडणे, बँक, सोसायटी, पतसंस्था यांची कर्ज वसुली, वीज वितरण कंपनीचे वीज पुरवठा वारंवार खंडीत करण्याचे प्रकार, ऊसाच्या तोडी, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी वगैरे प्रश्नात सतत सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन त्यांना न्याय मिळवून देण्यात स्व. प्रल्हाद भाऊ आघाडीवर असत तीच भूमिका घेऊन डॉ. शिवाजीराव गावडे कार्यरत असल्याने त्यांनी सहकारी रुग्णालयाची संकल्पना आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून साकारली असल्याचे नमूद करताना हे सहकारी रुग्णालय आरोग्य क्षेत्रात दिपस्तंभ ठरेल याची ग्वाही अरविंद मेहता यांनी दिली.

जॉन मेकॉले यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात येथील सर्वसामान्यांवर तत्कालीन ब्रिटिश शासन/प्रशासनाचा वचक राहिल अशा पद्धतीचे केलेले कायदे स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही कायम राहिल्याने लोकांनी, लोकांच्यासाठी, लोकांच्या माध्यमातून चालविलेले लोकशाही राज्य अस्तित्वात येण्याऐवजी शासन/प्रशासनाच्या वर्चस्वाखाली कार्यरत असलेली अनोखी लोकशाही व्यवस्था कार्यरत असून अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करताना त्यामध्ये योग्य बदल होऊन देशात लोकशाही राज्य व्यवस्था प्रस्थापित व्हावी अशी अपेक्षा अरविंद मेहता यांनी व्यक्त केली.
ब्रिटीश राज्य व्यवस्थेतील प्रचलित कायद्याद्वारे शासन/प्रशासनाचे वर्चस्व सर्वसामान्य माणसांवर लादले जात असल्याने सामान्यांना न्याय मिळत नसल्याचे स्पष्ट करताना अधिकाऱ्यांकडे न्याय्य हक्काची मागणी करण्याची संधी राहिली नाही, वीज बिल भरुनही वीज पुरवठा खंडीत करणे, जमीन खरेदी विक्रीच्या नोंदी वेळेवर न करणे, पीक पाहणी नोंद, रेशन धान्य व्यवस्थेतील त्रुटी, बँकांची अरेरावी, पाटाचे पाणी वेळेवर न मिळणे यासारख्या प्रश्नात सामान्य माणूस जाब विचारु शकत नाही, एखाद्याने धाडस केलेच तर शासकीय अधिकारी/कर्मचारी प्रसंगी शासकीय कामात अडथळा आणल्याची भाषा करतात मात्र सामान्य माणूस काही करु शकत नसल्याचे अरविंद मेहता यांनी स्पष्ट केले.

प्रारंभी डॉ. शिवाजीराव गावडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात सर्वरोग निदान व उपचार शिबीर आयोजनाचा उद्देश स्पष्ट करताना शिबीरासाठी बारामती, फलटण, पुणे येथून आलेल्या डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. गोखळी, खटकेवस्ती, जाधववाडी, पवारवाडी, साठे, गुणवरे परिसरातील गरजू रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला. शिबीराचे सुत्रसंचालन राजेंद्र पवार यांनी केले. यावेळी विस्तार अधिकारी संजयकुमार बाचल, नंदकुमार गावडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सागर गावडे पाटील, पोलीस पाटील विकास शिंदे, महेश जगताप, पप्पू जगताप, बाळासो धनवडे आशा वर्कर दुर्गा फडके, संगीता मचाले, त्रिवेणी घाडगे यांनी शिबीरासाठी सहकार्य केले.

भाजप तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज गावडे, विश्वास दादा गावडे, प्रा. तानाजी गावडे, बारामती केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष सूर्यकांत खटके, खटकेवस्ती सरपंच बापूराव गावडे, डॉ. राधेश्याम गावडे, मारुती बापू गावडे, सिद्धिविनायक सहकारी रुग्णालयाचे संचालक डॉ. अमोल आटोळे, डॉ. हनुमंतराव गावडे, डॉ. सोमनाथ वायसे, डॉ. निलेश गावडे, डॉ. योगीराज गावडे, आकाश घाडगे, हनुमंतराव जाधव, राहुल भारती, सौ. वनिता गावडे, डॉ. निखिल गावडे, डॉ. समीर गावडे, सचिव किशोर जगताप यांनी शिबीराचे उत्तम नियोजन केले.

गोखळी ग्रामपंचायत व गोखळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सर्व पदाधिकारी, संचालक, श्रीराम पतसंस्था यांनी शिबीरासाठी आर्थिक व वस्तू रुपाने मदत केली. विस्ताराधिकारी संजय बाचल यांनी सर्व रुग्णांना चहापानाची व्यवस्था केली. रोग निदान करताना डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधापैकी बहुतांश औषधे उपलद्ध असल्याने सर्व रुग्णांना औषधे मोफत देण्यात आली, अशा औषधांची किंमत सुमारे ९० हजार ते एक लक्ष रुपये इतकी होती. हाडांची ठिसूळता तपासणी सामान्यपणे प्रति एक हजार ते दीड हजार रुपये आकारणी केली जाते ती तपासणी गावडे हॉस्पिटल, बारामती यांच्या माध्यमातून मोफत करण्यात आली सुमारे १२५ रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला.

प्रा. आरोग्य केंद्र, बरड व उपकेंद्र गोखळी यांचे मार्फत १०० रुग्णांची रक्तशर्करा चाचणी मोफत करण्यात आली. निदान हॉस्पिटल गोखळीचे डॉ. अमोल आटोळे यांनी ३० ते ३५ रुग्णांचे ईसीजी मोफत काढून त्यांना त्याबाबत योग्य वैद्यकीय सल्ला दिला. ७० रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी केल्यानंतर त्यापैकी १७ रुग्णांना मोतीबिंदूचे निदान झाले आहे. त्वचा आजार तपासणी ४३ रुग्णांची तपासणी झाली, दंतरोग १५, जनरल सर्जरी ३८, मधुमेह व हृदय रोग ६० रुग्ण तपासले गेले, स्त्रीरोग ३५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या शिबीरासाठी Centure फार्मा कंपनीचे प्रमोद पालीवाल व किरण पोटफोडे, Mega health careचे महेश यादव, Aristoचे मयूर हनुमंते, Bluecrossचे आशिष सांकला, संदीप भोपळे सुधीर मदने, Meridian companyचे योगीराज गावडे, Systopic pharmaceuticalsचे धीरज थोरात, जीवन शेवाळे, Mecoldoes companyचे आकाश घाडगे यांनी मोलाचे सहकार्य केले.
रुग्णालयाचे व्हाईस चेअरमन चेतन गावडे यांनी सर्वांचे स्वागत केले. निलेश गावडे, विराज गावडे यांनी संपूर्ण दिवस औषध वितरण केले. आलेल्या सर्व डॉक्टरांचे आभार मनोज गावडे, चेतन गावडे, प्रा. तानाजी गावडे, बाबा वरे, बाळासाहेब गावडे यांनी मानले.
संस्थेचे सभासदत्व खुले असून फलटण तालुक्यातील कोणीही व्यक्ती सिद्धिविनायक सहकारी रुग्णालयचे सभासद होऊ शकते त्यासाठी प्रवेश फी रुपये १०० व भाग भांडवल रुपये २ हजार पाचशे असे शुल्क आहे. संस्थेचा सभासद होण्याचा अर्ज संस्थेचे ऑफिस, गोखळी येथे उपलब्ध आहे.

मागील आठवड्यामध्ये संस्थेचे एकूण ५७ सभासदाची आरोग्य तपासणी केली असून सर्व सभासदांना लवकरच हेल्थ कार्ड दिले जाणार आहे. सदर कार्ड भविष्यामध्ये विमा उतरवणे, बारामती, फलटण, पुणे येथे अल्प दरामध्ये वैद्यकीय उपचार करण्यासाठी उपयोगी ठरेल यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. शिबीर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य डॉ. गणेश गावडे, अभिजीत जगताप, राधेश्याम जाधव, विद्या जगताप, दिगंबर महाराज घाडगे, सुरेश चव्हाण, जालिंदर भंडलकर, दत्ता ढोबळे यांनी मोलाचे सहकार्य केले.


Back to top button
Don`t copy text!