दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२१ । फलटण । येथील जुनी स्टेट बँक कॉलनी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उपक्रमशील व सामाजिक कार्यात अनमोल योगदान देत असते. मंडळाच्यावतीने गणेशोत्सव काळात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच कोव्हिड 19 जनजागृती व सबलीकरण असे विविध उपक्रम राबवले होते. याच उपक्रमांतर्गत पर्यावरण निरीक्षण निमित्ताने मंडळाच्या वतीने मंडळाच्या सदस्यांसाठी सातारा दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
सहलीचा शुभारंभ फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी प्राथमिक विद्या मंदिर फलटणचे मुख्याध्यापक रुपेश शिंदे यांचे हस्ते करण्यात आला. सदर सहलीदरम्यान बारा मोट विहिर, कास पठार, भांबवली धबधबा, बामणोली या ठिकाणी सदस्यांनी भेट दिली. या सहलीत 25 सदस्य सहभागी झाले होते.
सहल यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर जाधव, कोरडे, तरटे, शुभम गारूले, सारंग माने, ओम जाधव, प्रा.पंढरीनाथ जगदाळे व सर्व सदस्य उपस्थित होते.