
दैनिक स्थैर्य । 7 ऑगस्ट 2025 । फलटण । येथील डी. एन. जाधव फाऊंडेशन संचलित श्री सेवागिरी महाराज अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा केंद्रातील सेमिनार हॉलचा उद्घाटन समारंभ गुरुवार दि. 7 रोजी सकाळी साडे दहा वाजता श्री सेवागिरी महाराज सांस्कृतिक भवन येथे होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ. प्रताप दिघावकर, महाराष्ट्र लोकसेवा आयोग माजी अध्यक्ष मधुकर कोकाटे यांचे हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमास मठाधिपती सुंदरगिरी महाराज, मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव वैभवराजे घाटगे, अप्पर आयकर आयुक्त विलास इंदलकर, सुधीर भंडारे, श्रीमती शोभा मूर्ती, मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त देवीदास क्षीरसागर जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. संजयकुमार जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.